अत्यावश्यक कामाशिवाय जनतेने बाहेर पडू नये -महसूल आयुक्त शिवाजी दौंड

6
0
Share:

कोरोना उपाययोजनेसाठी कोकण विभागात 15 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत तीन वैद्यकीय तपासणी केंद्र सुरु करण्यात आली असून बाहेरून येणा-या वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : कोकण विभागातील जनतेला आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोरोना संदर्भात कोकण विभागात शासकीय पातळीवर सर्व प्रकारची यंत्रणा कार्यान्वित झाल्या असून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा काम करीत असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. गे

ल्या काही दिवसात कोकण विभागातील सात जिल्हयात महसूल, पोलीस, नगरपालिका आणि ग्रामपंचायत पातळीवर यंत्रणा सज्ज आहे. संबंधित जिल्हाधिका-यांना आणि जिल्हास्तरीय अधिकारी यांना आवश्यक ते प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत. कालपासून कोकणातील महत्वाची देवस्थाने भाविकांसाठी बंद करण्यात आली असून त्यात केवळ पुजा केली जाईल. विमानतळ आणि जेएनपीटी येथे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. कोरोना उपाययोजनेसाठी कोकण विभागात 15 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचे वाटप जिल्हयांना करण्यात आले आहे. नवी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत तीन वैद्यकीय तपासणी केंद्र सुरु करण्यात आली असून बाहेरून येणा-या वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. कोकण विभागात अनेक ठिकाणी पालखी सोहळा, यात्रा, शोभायात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात ते देखील स्थानिक स्तरावर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

या पत्रकार परिषदेस उपायुक्त (महसूल) सिधाराम सालीमठ, उपायुक्त (पुरवठा) शिवाजी कादबाने, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, उपजिल्हा रुग्णालय पनवेल डॉ.बी.जी.फाळके आदि उपस्थित होते.
—————–

Share: