परतीच्या पावसाने शेतकरी सुखावला

22
0
Share:

परतीच्या पावसाने शेतकरी सुखावला

सविंदणे-कवठे येमाई, सविंदणे, मलठण, आमदाबाद, टाकळी हाजी, जांबूत, पिंपरखेड तसेच दुष्काळी भागातील कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, मोराची चिंचोली, शास्ताबाद, लाखेवाडी या परिसरात परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, कांदा या पिकांना पावसाने दिलासा दिला आहे.

या भागातील तळी, नाले, बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. बऱ्याच दिवसानंतर चांगला पाऊस झाल्याने अनेक वर्षांतून या भागातील तळी, नाले भरले आहेत. या पावसाने कवठे येमाई, मलठण येथे रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरील वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती.

सध्या या हगांमात या भागामध्ये कांदा, बटाटयाची लावगड मोठया प्रमाणात केली जात आहे. पाऊस समाधानकारक झाल्याने या पिकांना चांगला फायदा होणार आहे.

Share: