शेअर बाजार वधारला

6
0
Share:

मुंबई: देशात आलेल्या आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील आठवड्यात काही घोषणा केल्या होत्या. या घोषणांचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 800 अंकाने वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा इंडेक्स इंडेक्स निफ्टी 11 हजारांवर पोहोचला आहे. दुपारी 2 वाजून 25 मिनिटावर निफ्टी 11 हजार 56 वर तर सेन्सेक्स 829 अंक वधारून 37 हजार 530 अंकावर पोहोचला.

आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे.

त्यामुळे शेअर बाजारात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 662 अंकाच्या वाढीसह 37 हजार 363 वर उघडला. नॅशनल एक्सचेंजचा निफ्टी 170 अंकाच्या वाढीसह 11 हजारांवर उघडला; परंतु काही वेळानंतर यात थोडी फार घसरण पाहायला मिळाली. सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 159 अंकांच्या वाढीसह 36 हजार 860 वर व्यापार करीत होता, तर निफ्टी 10 हजार 860 अंकावर व्यापार करीत होता.

अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी केलेल्या घोषणेनंतर पब्लिक सेक्टर बँका, ऑटो आणि गृहकर्ज स्टॉक्समध्ये वाढ होईल, असा ब्रोकरेजचा अंदाज होता. अर्थमंत्र्यांने बँकांसाठी तात्काळ 70 हजार कोटी आणि होम लोन कंपन्यांसाठी 20 हजार कोटींचे अतिरिक्त भांडवल देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत दोन टक्के वाढ होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता.

Share: