यंदा द्राक्षे आंबटच, अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानाचा हंगामावर परिणाम.

26
0
Share:

रेश्मा  निवडुंगे-एपीएमसी न्युज

नवी मुंबई: अवीट गोडी आणि जीभेला सुंदर स्वादाचा आनंद देणारी द्राक्षे डिसेंबर उलटला तरी बाजारात नाहीत.नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामान यामुळे द्राक्ष हंगाम लांबणीवर पडला आहे.त्यामुळे २० जानेवारी नंतर खरा द्राक्ष हंगाम सुरू होण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.त्यामुळे बाजारभाव ही चढ्या दरात आहेत.त्यामुळे ग्राहकांना द्राक्षे यंदा आंबट असल्याचे बोलले जात आहे.


गतवर्षी दुष्काळ आणि या वर्षी तब्बल ५ महिन्याचा पावसाळा,अत्यंत प्रतिकूल हवामान अवकाळी संकटांना तोंड देत द्राक्षे बाजारात आली आहेत.या द्राक्षाची चव आंबट असून यावर सफेद रंगाचे ठिपके आहेत.याशिवाय चिलटा सारखा किडा द्राक्षांवर पडलेला आहे.सध्या बारामती,इंदापूर,तासगाव येथून द्राक्षांची आवक सुरू आहे.सध्या बाजारात थमसन प्रकारची द्राक्षे उपलब्ध आहेत.ही द्राक्षे चवीला आंबट गोड आहेत.घाऊक बाजारात ही द्राक्षे ६०रु प्रति किलो या दरात विकली जातात तर काळी शरद प्रकारची द्राक्षे ४० रु प्रति किलो या दरात विकली जातात.किरकोळ बाजारात ही द्राक्षे अनुक्रमे १८० रु प्रति किलो तर २०० रु प्रति किलो दरात उपलब्ध आहेत.सोनाक्का प्रकाराची लांबट आकाराची गोड द्राक्षे अजून बाजारात उपलब्ध नाहीत त्यामुळे खिश्याबरोरच चवीलाही द्राक्षे ग्राहकांना आंबटच आहेत.

Share: