यावर्षी वाजत गाजत निरोप न देता भक्तिभावाने दिला जातोय बाप्पाला निरोप

17
0
Share:

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता,यंदा गणेशभक्तांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.यंदा बाप्पाला वाजत गाजत निरोप न देता भक्तिभावाने निरोप दिला जातोय.काही गणेशमंडळानी गणपती विसर्जनाची सोय मंडपातच केली आहे.अनंत चतुर्थी ही दरवर्षी जल्लोषात साजरी केली जाते,पण यावर्षी मात्र गर्दी न करता,आवाज न करता बाप्पाला निरोप द्यावा लागत आहे.समुद्र किनारी, तलाव अशा ठिकाणी विसर्जन करण्यासाठी शासनाने मनाई केली आहे,त्यामुळे कृत्रिम तलाव तयार करून बाप्पाचे विसर्जन होत आहे.

तसेच,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी आज सायंकाळी श्री गणेश विसर्जन करण्यात आले.निवासस्थान परिसरात खास तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात श्रीगणेश मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी, मंत्री आदित्य तसेच तेजस ठाकरे यांनी श्री गणेशाची पूजा केली.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा देत, कोणताही गाजावाजा आणि ढोल ताशाचा आवाज न करता मुख्यमंत्रांच्या सहकुटूंबानी लाडक्या गणरायाला निरोप दिला.

Share: