मुंबई एपीएमसी दाना मार्केटमध्ये स्लॅब कोसळून तिघे जखमी

11
0
Share:

नवी मुंबई : मुंबई एम पी एम सी बाजारात स्लॅब कोसळला असून या अपघातात तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत . या घटनेतून ए पी एम सी बाजारसमिती प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसून येत आहे.

मुंबई एपीएमसी मधील दाना मार्केट परिसरातील एम गली येथील प्रवेशद्वारा लगत असलेल्या रिटेल ट्रास्पोर्ट असोसिएशनच्या कार्यालयात कामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. या अपघातात तिघे जखमी झाले आहेत
या जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाना मार्केट मधील व्यापारी पोपटलाल भंडारी हे तात्काळ पोहोचले व त्यांनी जखमींना त्वरित रुग्णालयात पाठवले .पोपटलाल भंडारी दाना मार्केट मध्ये संचालक पदासाठी उभे असून काल त्यांची प्रचार रॅली होती.

दाना मार्केट मध्ये एम गल्ली येथे रिटेल ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे कार्यलय आहे. या कार्यालयाततुन मुंबई,ठाणे,कल्याण आदी भागात माल पाठवला जातो. या मालाचा पूर्ण हिशोब येथेच पहिला जातो. या कार्यालयाच्या आवारात बसलेले तिघे स्लॅब कोसळून जखमी झाले आहेत. या घटनेमुळे ट्रान्सपोर्टेर ,व्यापारी ,ग्राहक आणि माथाडी कामगार सुरक्षित कधी होणार? अशी संतप्त प्रतिक्रिया ट्रान्सपोर्टेर यांनी व्यक्त केली आहे .मार्केट अभियंत्यांच्या बोगस कारभारमुळे या प्रकारच्या घटना वारंवार घटत आहेत. मार्केट मध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू असते तसेच व्यापाऱ्यांकडून एपीएमसी प्रशासन करही घेतात मात्र सुविधांचा नेहमीच या ठिकाणी वानवा पाहायला मिळत आहे.

Share: