Breaking: तिकीट काउंटर सुरू

21
0
Share:

 

मुंबई: रेल्वे मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर लॉकडाऊनच्या दोन महिन्यानंतर देशात पहिल्यांदा इतक्या मोठया प्रमाणात ठप्प झालेली रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. अखेर येत्या 1 जूनपासून 200 एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. या गाड्यांची ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू करण्यात आल्यानंतर आज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या निवडक रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु करण्यात आली आहे.
मुंबईत मर्यादित स्वरूपात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवरील आरक्षित गाड्यांचे काउंटर्स सुरू झाले आहेत. सध्या ज्या विशेष राजधानी गाड्या आणि दोनशे एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. फक्त त्याच गाड्यांचं आरक्षण या काउंटरवर देण्यात येत आहे. सोशल डिस्टंसिंग पाळून तिकीट घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला सोडण्यात येत आहे. तसेच सुरक्षा रक्षक ही तैनात केल्याचं पाहायला मिळतंय.
मुंबईत मध्य रेल्वेच्या या स्थानकांवर सुरू तिकीट काऊंटर
सीएसएमटी – 4
एलटीटी – 3
दादर – 2
ठाणे – 2
कल्याण – 2
पनवेल 2
बदलापूर 1

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या खालील स्थानकावर तिकीट काउंटर सुरू
चर्चगेट -2
मुंबई सेंट्रल – 2
वसई रोड – 2

 

Share: