कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता सोबत बैठक

6
0
Share:

मुंबई: अनलॉक केल्यानंतर मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही निश्चितच काळजीची गोष्ट असली तरी मुंबई पालिकेची सक्षम तयारी पाहिल्यानंतर मला खात्री आहे आपण हा प्रादुर्भाव चांगल्यारीतीने रोखू ,चेस दि व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब , माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित आहो. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करून घ्या सार्वजनिक तर ठीक आहे पण वैयक्तिक स्वच्छतेला खूप महत्व देणे गरजेचे. मास्क हा या पिढीसाठी आवश्यक बाब बनली आहे. लोकांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक आहे त्यादृष्टीने जागृती करणे आवश्यक आहे.

आपण धारावी आणि वरळीत करून दाखविले, त्यासाठी आपले कौतुक झाले पण हुरळून न जाता ढिलाई न दाखवता अधिक जोराने काम करा. दिवसाला 1000 किंवा 1100रुग सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत असे वाटत होते पण गेल्या दोन दिवसांपासून 1900 आणि 1700 रुग्ण सापडत आहेत त्यामुळे पुढील दोन तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे हे निश्चित आहे

सध्या आपण मुंबईत आणखी 5 ते 6 हजार बेडस उपलब्ध करून देऊ शकतो पण पुढील काळात सुविधाही आणखी वाढवावी लागणार तसेच ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडच्या नियोजनाची गरज आहे

मुंबईतच नव्हे तर राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीतजास्त प्रमाणात वैद्यकीय कारणासाठी उपयोगात आणणे असे आदेश काढावे लागतील

ट्रेकिंग आणि ट्रेसिंग वाढवून एकेका रुग्णाचे 20 नव्हे तर 30 संपर्क शोधणे आणि 48 तासांच्या आता त्या हाय रिस्क संपर्काची चाचणी करणे खूप आवश्यक आहे

लोकांना वाटते जम्बो रुग्णालयांत त्यांना उपचार मिळणार नाही पण वास्तविक पाहता जगात जे काही उपलब्ध आहे त्या डायलिसीस, आयसीयूच्या उत्तम सुविधा याठिकाणी आहेत. मोठ्या खासगी रुग्णालयांत जे आहे ते सर्व याठिकाणी असून पालिकेने अतिशय उत्कृष्ट दर्जाची सुविधा , डॉक्टर्स याठिकाणी दिल्या आहेत

कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत काही दुष्परिणाम दिसत आहेत मात्र हे दुष्परिणाम कोविडचे आहेत की जे आक्रमक औषधोपचार केले आहेत त्याचे आहेत हेही पाहिले पाहिजे

पोस्ट कोविड उपचारांना तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी चांगली व्यवस्था उभारा

औषध नसले तरी उत्कृष्ट रुग्ण सेवा आवश्यक आहे. यामुळे मृत्यू दर कमी होऊ शकतो
नुसते बेडस, औषधे दिले म्हणजे आपण सुटलो असे नाही , रुग्ण सेवा चांगली पाहिजे. शिथिलता दूर करा, चूक शोधा आणि पाऊले टाका

*बैठकीतले इतर महत्वाचे मुद्दे*

मुंबईतले 11 वॉर्ड बी, सी, ए, आरएन, एमडब्ल्यू, एचडब्ल्यू, एचई, एमई, पीएस, एफएन, ई यामध्ये कोविड पॉझिटिव्हचे प्रमाण खूप कमी म्हणजे 7 ते 8 टक्के इतके आढळले तर उर्वरित 13 वार्डात अधिक पॉझिटिव्हीटी आढळत आहे

मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यू दर कमी होत आहे. जून मध्ये तो 5.58%, जुलै 4.88%, ऑगस्ट 4.07%, सप्टेंबर 2.6%

मुंबईत अतिशय उत्कृष्ट जम्बो सुविधा असून रुग्णांनी खासगी रुग्णालयांचा आग्रह न धरता याठिकाणी दाखल व्हावे, त्यांना निश्चितपणे चांगले उपचार मिळतील

प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याने त्यांच्या वॉर रुमद्वारे नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करावी व जम्बो मध्ये दाखल करण्यावर भर दयावा50 वयापेक्षा जास्त आणि लक्षणे नसणाऱ्या व इतर कुठलेही मोठं आजार नसणाऱ्या व्यक्तींना घरीच विलगीकरणात ठेवावे मुंबईत घरी विलगीकरण असलेल्या रुग्ण व त्यांच्या परिवारात लागण मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते

पूर्वी कोविड मुळे मुंबई पालिका व सार्वजनिक रुग्णालयांत असलेला मृत्यू दर 82 टक्के होता तो आता 59 टक्के इतका कमी झाला तर खासगी रुग्णालयांत पूर्वी कमी असलेला 18 टक्के मृत्यू दर वाढून 39 टक्के झाल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली प्रत्येक जम्बो सुविधा नामांकित व मोठ्या रुग्णालयांच्या डॉक्टर्सना विभागून देखरेखीसाठी देण्याचा विचार

Share: