नाशिक: पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाचा आजचा 5 दिवस..

7
0
Share:

नाशिक येथे पुणतांबा येथे शेतकरी आणि त्यांच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा आजचा 5 दिवस आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार शेतकरी मुलींनी घेतला आहे.

आज पाचव्या दिवशी शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली असून तिला अहमदनगर मधील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच दिवस झाले तरी या आंदोलनाची दखल अजून प्रशासनाने घेतली नाही आहे. प्रशासन जर असच आंदोलनाला दुर्लक्ष करत असेल तर आज पाचव्या दिवशी ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

Share: