लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरासाठी तांदूळ घेऊन आलेले ट्रकचालक उपाशी

–मुंबईला धान्याचा पुरवठा करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्यासाठी पिण्याचं पाणी आणि जेवणाची सुविधा नाही,मुंबई एपीएमसी धान्य मार्केटच्या प्रकार.
नवी मुंबई:कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने देशभरात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये त्यासाठी हजारो किलोमीटर प्रवास करुन शेकडो ट्रक गहू, तांदूळ, डाळी आदी खाद्यपदार्थाची वाहतूक करतात. मात्र, याच ट्रकचे ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्यासाठी पिण्याचं पाणी आणि जेवणाचीही सुविधा नसल्याचं समोर आलं आहे . त्यामुळे या ट्रक चालकांना हालाखीच्या परिस्थितीत राहण्याची नामुष्की आली आहे त्यामुळे धान्यमार्केटच्या संचालक आणि ” ग्रोमा ” संस्था कोणासाठी काम करतात अशी चर्चा बाजार आवारात होत आहे. जे व्यापारी कोरोना सारख्या महामारीच्या फायदा घेऊन आणि आपल्या स्वार्थासाठी माल मागवून भाव वाढबून विक्री करतात ,फायदा झालेल्या मालाची किंमत मध्ये कमीत कमी आपल्या ड्रायव्हर आणि क्लिनरला जेवण ,पिण्याची पाणी नाही देऊ शकतो ते मुंबईकरांसाठी जीवनावश्यक वस्तू कसा पध्दतीने पुरवठा करणार ,व्यापारी आपल्या स्वार्थासाठी काम करतात अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अनर्जीत चव्हाण यांनी दिली आहे.
मुंबई एपीएमसी परिसरात आणि ट्रक टर्मिनलमध्ये देशाच्या सर्व भागातून शेकडो धान्याच्या गाड्या येऊन थांबल्या आहेत. सध्या धान्य बाजारात कोरोनाचे 16 रुग्ण आढल्याने काही व्यापारी घरात क्वारेनटाईन करून घेतले आहेत बाकी काही व्यापारी येतात आपल्या फायदासाठी त्यांना कोरोनाचे कुठल्याही प्रकारची भीती नाही.सोशल डिस्टनसिंग पालन नकेल्याने धान्य मार्केट बंद करण्यात आला होता ,मार्केट सुरळीत करण्यासाठी कोकण आयुक्त शिवाजी दौंड , एपीएमसी प्रशासक व सचिव अनिल चव्हाण , ग्रोमा संस्थेचे पदाधिकारी ,धान्यमार्केटचा संचालक निलेश वीरा आणि पोलिस उपायुक्त पंकज दहाने,एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत धान्य मार्केटमध्ये दिवसभरात बाहेरुन येणाऱ्या कडधान्याच्या 300 गाड्या आत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काही व्यापाऱ्यांकडून जास्त माल मागवण्यात आला. दुसरीकडे अनेक व्यापाऱ्यांच्या गोदामातही मोठ्या प्रमाणात कडधान्य पडून असल्याचं दिसत आहे. त्यामुळे एपीएमसी परिसरात आणि ट्रक टर्मिनलमध्ये मोठ्या प्रमाणात कडधान्याच्या गाड्या जवळपास 8 ते 10 दिवसांपासून उभ्या आहेत. या स्थितीत गाड्यांमध्ये असणाऱ्या ड्रायव्हर आणि क्लिनर लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सध्या या चालकांसाठी गुरुद्वाराकडून काही प्रमाणात जेवणाचे वाटप होते. मात्र जेवण झालं की पिण्यासाठी पाण्याची सोय नाही, रस्त्यावर जसं पाणी मिळेल तेच अशुद्ध पाणी पिण्याची वेळ येत आहे. हे पाणी खूप खराब असल्याची तक्रार या चालकांनी केली आहे. इम्तियाज नावाचे चालक आंध्रप्रदेशमधून 6 दिवस झाले तसे तांदूळ घेऊन आले आहेत. त्यांना अजूनही टोकन मिळालेलं नाही. मात्र, काही दलाल 500 ते 1000 रुपये घेऊन सुरक्षा अधिकारीला हातात धरून गाडी आत सोडण्याचं काम करत असल्याचीही तक्रार चालकांकडून येत आहेत. इम्तियाज म्हणाले, “मुंबईमध्ये लोकांना जेवणाचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही हजार किलोमीटर प्रवास करुन आलो. मात्र, आम्हालाच जेवण मिळत नाही. व्यापाऱ्याला फोन केल्यावर ते कधी उचलतात, तर कधी उचलतही नाही. सरकारने आमच्याकडे लक्ष्य द्यायला पाहिजे.
इम्तियाजसारखे शेकडो ड्रायव्हर रात्रंदिवस हजारो किलोमीटर गाड्या चालवून मुंबईकरांना जेवण मिळेल यासाठी अन्नधान्याची वाहतूक करत आहेत. मात्र, त्यांनाच धान्य मार्केटमध्ये कोणतीही सोयी सुविधा मिळत नसल्यानं या चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आता 2 दिवस बाजार बंद असल्याने गेली 7 ते 10 दिवसांपासून हजारो टन धान्य गाड्यावर पडून असल्याचं दिसत आहे. एपीएमसी परिसरात आणि ट्रक टर्मिनलमध्ये 1 हजारपेक्षा अधिक गाड्या उभ्या आहेत. यामध्ये तांदूळ, गहू, डाळी, मसाले इत्यादी पदार्थांचा समावेश आहे.
Truck drivers suffering for food and Water in APMC