नवी मुंबई मध्ये POPPY STRAW या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन इसमास अटक 

10
0
Share:
नवी मुंबई:  नवी मुंबई मध्ये अमली पदार्थ विरोधी अभियान राबवण्याचा  अनुषंगाने. वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिमंडळ १ चे अधिकारी व कर्मचारी परिमंडळ १ हद्दीत पेट्रोलीग करत असताना.
एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत कोपरी गाव येथे सुनील बलवन्ता, राम बिष्णोइ वय वर्षे २८ या दोन इसमाना.  प्लॅस्टिक कॅरिबागमध्ये POPPY STRAW या अंमली पदार्थांची विक्री करत असताना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांच्या घराची झडती घेतली असता एका प्लॅस्टिक गोणीमध्ये सुमारे ७ किलो ६९० ग्रॅम POPPY STRAW हा अमली पदार्थ मिळाला.
सदर इसमास ताब्यात घेऊन एपीएमसी पोलीस ठाणे येथे १६६/२०२० एनडीपीएस कायदा १९८५ कलम ८ (क) १५, तसेच १८८,२६९,२७० आणि साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.(Two drug dealers arrested in Navi Mumbai)
Share: