*कोणी पाठीत वार करण्याचा प्रयत्न करु नये, असा उद्धव ठाकरे

21
0
Share:

कोणी पाठीत वार करण्याचा प्रयत्न करु नये,-असा उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात आज अनपेक्षित घडामोडी घडल्या. भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनवर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज वीयबी सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाजपवर जोरदार प्रहार केला. पाकिस्तानवर जसा सर्जिकल स्ट्राइक केला तसा महाराष्ट्रावर केंद्र सरकारने फर्जिकल स्ट्राईक केला, अशी टीका त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केली आहे.
कुणीही पाठीत वार करण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेना जे काही करते ती उघडपणाने करते. आमचा रात्रीस खेळ नाही. तर आम्ही सर्व दिवसाढवळ्या करतो. ते समोरचे लोक फोडून करतात. आम्हाला विरोधीपक्ष नको, प्रतिस्पर्धी नको असे सध्या सुरु आहे. कोणी पाठीत वार करण्याचा प्रयत्न करु नये, असा उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात लोकशाहीच्या नावावर खेळ सुरु आहे. हे लाजिरवाणे आहे, अशी खंत उद्धव ठाकरे यांनीव्यक्त केली. तर शरद पवार यांनी, अजित पवारांची भूमिका पक्षविरोधी असल्याचे म्हटले. भाजप विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला.

या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थित होते.

Share: