शेतीशास्त्र समजून घेऊनच उपाययोजना करा : डॉ. कौसडीकर

37
0
Share:

जमीन सुपिकतेसाठी शेती शास्त्र समजून घेऊनच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी शिरोळ येथे व्यक्त केले.

श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने आयोजित क्षारपड जमीन सुधारणा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण शिबिरात डॉ. कौसडीकर बोलत होते. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कौसडीकर म्हणाले, ‘‘निसर्गातील बदलानुसार पिकाचे व्यवस्थापन करणे गरजेचे राहिले आहे. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे वाढू शकेल, तसेच जमिनीचा क्षारपड होण्यापासून बचाव होऊ शकेल.’’

सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अझेटोबॅक्टर पीएसबी या जिवाणू खतांचा वापर करण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक असल्याची माहिती डॉ. चौसाळकर यांनी दिली.

या प्रसंगी डॉ. मोहन बेलगमवार यांनी सूक्ष्म जिवाणू, सेंद्रिय पदार्थ यांची माहिती दिली. डॉ. ओझा यांनी देशी गायीचे महत्त्व सांगितले. कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाणाणा यांनी स्वागत केले. या वेळी बाळकृष्ण जमदग्नी, श्री. चौगुले, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संजय पाटील, आदी उपस्थित होते. ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.

Share: