अनोळखी व्यक्तीची प्रेमकथा कैद करणारा चित्रपट: फोटोग्राफ

6
0
Share:

दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजने आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सुरुवातीला लहान लहान भूमिका साकारणारा हा कलाकार आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता झाला आहे. नवाजकडे सध्या अनेक प्रोजेक्ट असून त्याच्या आगामी फोटोग्राफी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये त्याच्यासोबत सान्या मल्होत्राही झळकली आहे.

या ट्रेलरमध्ये दोन अनोळखी व्यक्तींमध्ये खुलणाऱ्या प्रेमाची कथा सांगण्यात आली आहे. यामध्ये नवाज एका फोटोग्राफरची भूमिका साकारत असून रफी असं त्याचं नाव आहे. तर सान्याने नुरी या मुलीची भूमिका वठविली आहे.
प्रदर्शित झालेला हा ट्रेलर अडीच मिनीटांचा आहे. रफीच्या आजीला त्याच्या लग्नाची घाई झाली आहे. त्यामुळे त्या आपल्या नातसुनेचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे नवाज नुरीच्या प्रेमात पडतो. त्यानंतर नुरी आणि आजीची भेट, त्या दोघींमधील नातं या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलं आहे.
हा चित्रपट १५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश बतरा दिग्दर्शित या चित्रपटाचं Sundance Film Festival मध्ये प्रीमिअर झाला असून बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्येही या चित्रपटाचं चांगलच कौतुक झालं आहे.

Share: