वापरे! तूर डाळ शंभरी पार,तूरडाळीच्या दरात 25 रुपयांची वाढ.

31
0
Share:
येन सणासुदीचे दिवस जवळ येऊन ठेवलेले असताना, तूरडाळीच्या दरात 25 रुपयांची वाढ.
नवी मुंबई : येन सणासुदीचे दिवस जवळ येऊन ठेपलेले असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य मार्केटमध्ये डाळींच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली पाहायला मिळतेय. दसरा तसेच दिवाळी सारखे मोठे सण समोर असताना. आठ दिवसांत तुरडाळीच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 15 दिवसाआधी डाळींचे भाव 80-86 रुपये प्रतिकिलो होते. सद्या बाजारात तूरडाळ 120 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे.
महाराष्ट्रात लातूर, अकोला,गुजरात या ठिकाणांहून तूरडाळीची आवक होत असते. महाराष्ट्रात डाळींचा दर 115 रुपये प्रतिकिलो तर गुजरात मधून येणाऱ्या डाळींचा दर 118ते 120 रुपये आहे. तर मूग,उडद आणि चना या डाळींच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. डाळींचा भाव 100 पेक्षा कमी असणे अपेक्षित आहे पण सध्या डाळींच्या दारात 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. काही व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार डाळींच्या दरात अजून 10 ते 15 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे,  जाणून बुझुन डाळींची आवक कमी करून, दरात वाढ असे काही मोठे व्यापारी करत आहेत सध्या कोरोना काळात आर्थिक परिस्थिती मंदवल्यामुळे तांदूळ व डाळ प्रत्येकाच्या घरी लागते.त्यामुळे आता डाळीच्या भाव कमी हवा होता.धान्य मार्केटचे घाऊक व्यापारी यांनी सांगितले की,अचानक भावाची वाढ झाल्याने व्यापाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, डाळींचा साठबजारामुळे ही भाव वाढ झालेली आहे. तुरडाळीच्या भाव वाढण्याची आता वेळ नाही अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.सरकारांनी यावर नियंत्रण केल पाहीचे नाहीतर डाळीचे भाव 150 पर्यन्त जाऊ शकतो.
Share: