वसंत पंचमीचा दिवस 2019

22
0
Share:

आज वसंत पंचमीचा दिवस आहे या दिवशी सरस्वती देवीची पूजा खूप मोठया उत्साहात केली जाते.
खासकरून हा उत्सव ओडिशा मध्ये राहणारे ओरिया समाजातील बांधव खूप उत्साहाने हा वसंत पंचमीचा सण साजरा करतात आणि देवी सरस्वतीच्या पूजेचा कार्यक्रम देखील खूप मोठ्या भव्य पद्धतीने साजरा करतात.
मुंबई मध्ये स्थित ओडिया समजतील सर्व लोक या दिवशी एकत्र येऊन खूप आनंदाने हा सण साजरा करतात. मुंबईत या कार्यक्रमाचं आयोजन जगन्नाथ सेवा ट्रस्ट यांच्या द्वारे केला जातो आणि हा कार्यक्रम एकाच दिवशी मुंबईत दोन ठिकाणी होतो एक मुंबईतील साकीनाका आणि नवी मुंबई येथील नेरुळ या ठिकाणी साजरा केला जातो आणि मुंबई मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या २३ वर्षांपासून होत आहे हे विषेश. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन रात्री केलं जातं आणि महाप्रसादाचा लाभ सर्व लोक आनंदाने घेतात.

Share: