इजिप्तहून आलेले कांद्याचे 5 कंटेनर वाशी घाऊक बाजारात दाखल. शेतकऱ्यांना फटका बसणार – APMC NEWS

19
0
Share:

कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करण्यात आली असून कांद्याचे 115 कंटेनर सध्या जेएनपीटीच्या बंदरात आले आहेत. त्यातील इजिप्तहून आलेले कांद्याचे पांच कंटेनर गुरुवारी पासून आले होते. अफगाणिस्तानहून चार कंटेनर कांदा मुंबई घाऊक बाजारात आला आहे. मात्र शुक्रवारसारखीच परिस्थिती शनिवारीही बाजारात आहे. महाराष्ट्रातील बराचसा कांदा बाजारात असल्याने या कांद्याला बाजारात उठाव मिळत नाही. कमी दरात हा कांदा विकला गेला तर त्याला उठाव मिळू शकेल, अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली आहे.

परदेशातून कांदा आपल्याकडे येणे हे काही आत्ता नवीन राहिलेले नाही. या पूर्वीही अनेकदा बाजारात इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या ठिकाणांहून कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे परदेशातील कांदा कसा आहे, हे आत्ता अनेक व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांना कळून चुकले आहे. परदेशातील कांद्याला आपल्या कांद्याची सर नाही. आपल्या कांद्यात असलेला तिखटपणा आणि चव अन्य ठिकाणच्या कांद्याला नाही. त्यामुळे इतर कुठल्याही ठिकाणांहून कांदे आले तरी त्यांना महाराष्ट्रातील कांद्याची सर नाही येत. त्यामुळे आपल्या कडील ग्राहकांना इतर ठिकाणचे कांदे आवडत नाहीत.

अशा परिस्थितीमुळे आत्ता आलेल्या या परदेशी कांद्यांना बाजारात उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आत्ता आपल्याकडील चांगला कांदा २० ते २५ रुपये किलोमध्ये मिळत आहे. तर, हा परदेशी कांदा आज बाजारात 25 ते 28 रु. किलोने उपलब्ध आहे. दरामध्ये कमिकेला कि ब्यापाऱ्याला परवडणारे नाही अशी स्थिती आहे . मात्र हा कांदा जेवणाची चव बिघडवत असल्याने त्याला खरेदीदार मिळत नाहीत. कांद्याची अत्यंत टंचाई असताना हा कांदा विकलाही गेला असता आणि त्याच हिशेबाने हा कांदा मागवला गेला आहे. मात्र हा कांदा मागवल्यानंतर तो येथे येईपर्यंत आपल्याकडे नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे आणि कांद्याची टंचाई बऱ्यापैकी कमी झाली आहे. शिवाय कांद्याचे दर वाढतील म्हणून अनेक किरकोळ व्यापाऱ्यांनी नेहमीपेक्षा अधिक कांदा बाजारातून खरेदी केला आहे. त्यामुळे बाजारात आत्ता कांद्याची मागणीही कमी झाली आहे.
सध्या जेएनपीटी परिसरात असलेल्या वेगवेगळ्या वेयर हाउस मध्ये कांदा साठला गेला आहे ,उठाव कमी झाल्यामुळे वाहेरून येणाऱ्या कांदा सडणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

मंगळवारी घाऊक बाजारात आपल्या कांद्याला २० ते २५ रु. किलोचा दर मिळाला असून कांद्याच्या 110 गाड्यांची आवक झाली आहे. मात्र तरीदेखील कांद्याला हवा तसा उठाव मिळाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Share: