गर्दी कमी होत नसल्याने दादरमधील भाजीपाला मार्केट बंद

85
0
Share:

मुंबई:कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यासोबत राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. पण यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. याच दरम्यान दादरमधील घाऊक भाजीपाला मार्केटही सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. पण या मार्केटमधील गर्दी कमी होत नसल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात (Dadar food market close) आला आहे.

दादर येथील सेनापती बापट मार्गावर हे मार्केट भरवले जात होते. येथे दररोज संचारबंदी लागू असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. पोलिसांनी बऱ्याचदा गर्दी न करण्याचे आवाहन करुनही नागरीकांची गर्दी वाढत होती. त्यामुळे पालिकेने हे मार्केट बंद केले आहे.

चार दिवसापूर्वी पालिकेने दादरमधील या मार्केटच विभाजन चार ठिकाणी केलं होते. यातील काही टक्के मार्केट दादरमध्ये सेनापती बापट मार्गावर सुरु ठेवण्यात आले होते. तर बाकीचे दहिसर जकात, एमएमआरडी एक्झिबिझेशन सेंटर, मुंलुंड जकात नाका आणि सोमय्या ग्राऊंड येथे सुरु ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत 300 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तर देशाता 1500 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे.

Share: