पालघर जिल्ह्याला पालकमंत्री आहेतच कुठे? आमदार निरंजन डावखरेंची पालकमंत्री दादा भुसेंवर टीका

11
0
Share:

-पालघर जिल्ह्याला पालकमंत्री आहेतच कुठे?

 

-आमदार निरंजन डावखरेंची पालकमंत्री दादा भुसेंवर टीका

-परतीच्या पावसामुळे भातपीकाच्या नुकसानीची आमदार डावखरेंनी केली पहाणी

-शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची केली मागणी

पालघर:  परतीच्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील भातशेतीचं मोठं नुकसान झालं असताना पालकमंत्री दादा भुसेंनी साधी पहाणीही केली नाही अथवा आढावाही घेतला नसल्यानं पालघर जिल्ह्याला पालकमंत्री आहेतच कुठे? असा सवाल करत आपात्तीप्रसंगीही पालकमंत्र्यांची अनुपस्थिती दाखवणं ही शोकांतिका असल्याची टीका भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी पालकमंत्री भुसेंवर केली. आमदार डावखरे हे बुधवारी भातपीकाच्या नुकसानीच्या पहाणी करण्याकरिता पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी वाडा तालुक्यातील गातेस येथे भातपीकाची पहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान झाल्यानं शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी देखील केली. यानंतर त्यांनी विक्रमगड आणि पालघर तालुक्यातील नुकसान झालेल्या भातशेतीची पहाणी केली.

 

Share: