मुंबई एपीएमसी प्रशासनाच्या आशीर्वादाने अतिक्रमण, पवार साहेब या अधिकाऱ्यावर  कारवाई कधी करणार!

26
0
Share:

एका पोटमाळा साठी व्यापाऱ्यांकडून 2 लाख रुपये तर वाढीव चटई क्षेत्रसाठी 5 लाख रुपये मार्केट अभियंताला द्यावला लागत .

-एपीएमसीचे माजी संचालकच अतिक्रमण करत असतील तर व्यापाऱ्यांना कोण थांबवणार?

-बाजार आवारात अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी एक पथक तयार करण्यात आला होता त्या पासून आता पर्यंत कोणत्याही अतिक्रमणवर कारवाई नाही .

 

नवी मुंबई:आपल्या कर्तव्यात कसुरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता झटका बसणार आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ‘कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असा इशारा अजित पवार यांनी मंत्रालयात एका बैठकीत दिला आहे.
याबाबत मुंबई एपीएमसी घाऊक बाजारमध्ये व्यापार करणाऱ्या बिगर गळधारक व्यापारी ,माथाडी कामगार व ग्राहक यांनी अजित पवार यांना विनंती केली कि बाजार समिती मध्ये कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई कधी करणार.दोन वर्षांपूर्वी बाजारसमिती मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. परंतु या पथकाने दोन वर्षपासून कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केलेली नाही.


यावरून हे पथक केवळ दिखाव्यासाठी तयार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे बाजारसमिती मध्ये होणाऱ्या कामकाज वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.असे भ्रस्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून त्यांच्या कडून बाजार समितीच्या होणाऱ्या नुकसान भरपाई वसुली करणे गरजेचे आहे असे प्रतिक्रिया काही बिगर गाळाधारक व्यापारी यांनी केले.
शहरातील अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमणांवर कारवाई करणारे नवी मुंबई महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही माकेर्टमधील व्यापारी गाळ्यांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या बेकायदा बांधकामांकडे मात्र कानाडोळा करीत आहेत.तसेच फुटपाथवर झालेल्या अतिक्रमण मुळे लोकांचे जीव धोक्यात येत आहेत. या अतिक्रमणांबाबत वारंवार तक्रारी होऊन देखील त्याकडे एपीएमसी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बिगर गाळाधारक व्यापारी करू लागले आहेत. या अतिक्रमणांना राजकीय नेते, एपीएमसी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळेच अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यापाऱ्यांना अभय मिळत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे या प्रचारात आप आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी व्यापारी बरोबर बाजार समितीचे काही अधिकारी आणि कर्मचारी पण कामाला लागले आहेत.दुसरीकडे फळ,भाजीपाला व मसाला मार्केट मध्ये पोटमाळा व वाढीव माजल्याचे बांधकाम जोरात सुरु आहे, एकीकडे अधिकारी निवडणूक मध्ये व्यस्त तर दुसरीकडे मुंबई एपीएमसीचे अधीक्षयक अभियंताच्या आशीर्वादाने मार्केट मध्ये पोटमाळा आणि वाढीव बांधकामची परवानगी दिल्या मुळे काही व्यापारी शटर बंद करून पोटमाळ्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत. सूत्राने सांगितल्या प्रमाणे एका पोटमाळा साठी व्यापाऱ्यांकडून 2 लाख रुपये तर वाढीव चटई क्षेत्रसाठी 5 लाख रुपये मार्केट अभियंताला द्यावला लागत आहे. त्यामुळे बिनधास्तपणे व्यापारी इथे बांधकाम करतात असे अधिकाऱ्यावर कारवाई कोणी केली तर त्याला लगेच काही राजकीय नेत्यांच्या फोन येतात .
2016 मध्ये तत्कालीन महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मसाला मार्केट मध्ये जवळपास 34 गाळे सील केले होते. यानंतर अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झालेली नाही. वाढीव मजल्यानंतर आता मार्जिनल स्पेसमधील जागेवर बांधकाम सुरू झाले असून ते थांबविण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबईतील गावठाणांमध्ये प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी एखादे बांधकाम करायला घेतले की तेथे लगेच महापालिकेचे अधिकारी हजर होतात. औद्योगिक परिसरातील एखाद्या झोपडीधारकाने पावसाळ्यापूवीर् झोपडीची डागडुजी करण्याचे काम सुरू केले तरी हे अधिकारी त्याला नोटीस बजावतात. परंतु बाजार समितीतील धनदांडग्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या गाळ्यांवर कितीही व कसेही बेकायदा बांधकाम केले तरी या बाजारपेठांमध्ये पाऊल टाकण्याची हिंमत अद्याप एपीएमसी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेली नाही.
मुंबईत या व्यापाऱ्यांना माल ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने व्यापाऱ्यांनी नवी मुंबईत माकेर्टची उभारणी करताना मालाची खरेदी-विक्री करण्यास व व्यापारी तसेच अन्य कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी व कार्यालयीन कामासाठी पुरेशी जागा असावी, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली होती. सरकारने त्यानुसार खाली गाळे आणि वर पेढी (कार्यालये) अशी गाळ्यांची रचना करून फळ, भाजी, मसाला व धान्य बाजाराची निमिर्ती केली. गाळे ताब्यात घेतल्यानंतर काही वर्षांतच व्यापाऱ्यांनी पेढ्यांच्या पुढील बाल्कनी पत्राशेड टाकून बंदिस्त केली. प्रशासन कारवाई करीत नसल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी बाल्कनीत पक्के बांधकाम करून त्याचे सुसज्ज कार्यालयवजा अँटीचेंबर करून घेतले. विशेष म्हणजे बाजार समितीच्या बाजारपेठांमधील आजी-माजी संचालकांच्या गाळ्यातही कमी जास्त प्रामाणात अतिक्रमण केल्याचे आढळून येते. काही व्यापाऱ्यांनी माकेर्टमधील व्यापारी गाळ्यांमध्ये अतिक्रमण केले. तर माकेर्टमधील मोकळ्या जागेमध्ये विना परवानाधारक व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. याशिवाय माकेर्टमधील उपहारगृह, रसवंती गृह, पान टपरी, चहावाले यांनी केलेल्याअतिक्रमणामुळे माकेर्टमध्ये घाणीचे साम्राज्य पसरण्याबरोबरच वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. एपीएमसीच्या माकेर्ट आवारातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणासंदर्भात ना आजी- माजी संचालक आवाज उठवताहेत ना व्यापारी. कारण प्रत्येकानेच अतिक्रमणाच्या या गंगेत स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले आहे.दरम्यान माकेर्टमधील हे अतिक्रमण कमी होते की काय म्हणून ज्या कारणास्तव एपीएमसीची उभारणी करण्यात आली व कृषी मालाच्या व्यापाराचे स्थलांतर मुंबईतून नवी मुंबईत करण्यात आले त्या उद्देशालाच आता व्यापाऱ्यांकडून हरताळ फासला जात आहे. फळे व भाजीपाला माकेर्टमधील अनेक व्यापाऱ्यांनी होलसेल व्यापार करण्याचे सोडून चक्क आपली जागा अनेक छोट्या-छोट्या व्यापाऱ्यांना किरकोळ व्यापारासाठी भाडेपट्टीवर दिली आहे. तर काही गाळ्यांमध्ये कृषी मालाचा व्यापार न होता पॅकेजिंगचेच काम बिनधास्तपणे चालत आहे. बाजार समिती किंवा महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामासाठीचे साहित्य मार्केटमध्ये आलेच कसे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मार्केटमध्ये देखभालीसाठी सुरक्षारक्षक व एपीएमसीचे कर्मचारी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम कसे करण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. व्यापाºयांच्या दबावामुळे कर्मचारी कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे. अशीच स्थिती राहिली तर मार्केटच्या दोन्ही विंगच्या मध्ये चालण्यास जागाही उपलब्ध होणार नाही. मार्केटमध्ये आग लागली किंवा इतर काही दुर्घटना झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.

एपीएमसीच्या पाचही माकेर्टमधील गाळ्यांचा सर्व्हे करून झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर एपीएमसीने कारवाई करावी अन्यथा महापालिकेने माकेर्टमधील अतिक्रमणांवर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केली जाईल अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अणासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.

एपीएमसी कर्मचाºयांकडूनही कारवाई नाही
बाजार समितीमधील सर्व व्यवहारावर एपीएमसी प्रशासनाचे नियंत्रण असते. पाचही मार्केटला संरक्षण भिंत आहे. परवानगीशिवाय कोणालाही मार्केटमध्ये कोणतेच साहित्य आणता येत नाही.

प्रत्येक गाळ्यांमधून सुरक्षारक्षक फेरी मारत असतात. यानंतरही मार्जिनल स्पेसमध्ये अतिक्रमण झालेच कसे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. देखभाल शाखेचे अधिकारी व कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत.

२०१६ मध्ये झाली होती कारवाई
मसाला मार्केटमधील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने २०१६ मध्ये कारवाई केली होती. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जवळपास ३४ गाळे सिल केले होते. यानंतर अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झालेली नाही. वाढीव मजल्यानंतर आता मार्जिनल स्पेसमधील जागेवर बांधकाम सुरू झाले असून ते थांबविण्याची मागणी होत आहे.

महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष : एपीएमसी मार्केटमधील बांधकामावर महानगरपालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही. महापालिका प्रशासनाने कधीच येथील अतिक्रमण थांबविण्यासाठी ठोस भूमिका घेतलेली नाही. सुरू असलेले बांधकाम थांबविलेले नाही व झालेले बांधकाम पाडलेले नाही. यामुळे अतिक्रमण करण्याचे मनोबल वाढत असून दिवसेंदिवस अतिक्रमणांची संख्या वाढत आहे.

Share: