डान्सबारच्या विरोधात महिला नेत्या आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात

37
0
Share:

सुप्रीम कोर्टाने डान्सबार पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय दिल्यामुळे या गोष्टींचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे. खासकरून महिला वर्गाचा खूप रोष आहे या गोष्टीवर महाराष्ट्रात २००५ साली डान्सबार बंद झाली आत्ता २०१८ ला सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून पुन्हा हे सगळं काही सुरू होणार आहे त्यामुळे साहजिकच याचं द्वेष कुठे ना कुठे तरी असणार आहेच.

आज पनवेल मध्ये पनवेल संघर्ष समितीने या डान्सबारच्या च्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत सभा घेतली या सभेत आर आर पाटील (आबा) यांची कन्या स्मिता पाटील, भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्याताई चव्हाण या उपस्थित होत्या यावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी थेट डान्सबार मध्ये घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तसंच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी डान्सबारचं प्रात्यक्षिक लावू असा इशारा दिला.

शासनाने कायदेशीर बाजू व्यवस्थित मांडली नसल्याने आज डान्स बार पुन्हा सुरू होणार आहेत. यामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होणार असल्याची चिंता दिवंगत आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी व्यक्त केल.
सरकारच्या नाकर्ते पणाचा फटका बसल्याने पुन्हा डान्स बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. न्यायालयाने निर्णय दिला असला तरी सरकार कायदा करून पुन्हा बंदी आणू शकत असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता याविरोधात रस्त्यावर लढाई करण्याचे आवाहन आमदार विद्या चव्हाण यांनी केले.

Share: