मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील शौचालयच्या पाण्यात धुतली जातत भाजी, व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

21
0
Share:
नवी मुंबई: भाऊ जरा चांगली आणि ताजी भाजी द्या…भाजी विकत घेताना हे वाक्य नेहमीच आपल्या तोंडी असतं. भाजी विकत घ्यायची म्हटली तर आपण ती भाजी ताजी आहे की नाही याची सारखी विचारणा विक्रेत्याला करत असतो. कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्ही वत घेतलेली भाजी ही शौचालयच्या पाण्यात धुतलेली आहे असं कळलं तर नक्कीच मोठा धक्का बसेल. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मुंबई एपीएमसी भाजीपाला मध्ये असलेल्या एका भाजी विक्रेता चक्क सडलेले पडलेली फणसाची बिया  उचलून शौचालयच्या पाण्या मध्ये धुतलेले दिसून येत आहे तिथे एका ग्राहकांनी भाव बिचारले तर त्यांनी शंभर रुपये किलो विकत असल्याचा संतापजनक प्रकार दिसत आहे.
मुंबई एपीएमसीत भाजीपाला मार्केट आवारात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजीपाला बाजार आवारात विकण्यासाठी आलेल्या शेतीमालाला खराब झाल्याने सडलेले भाजीपाला उचलून त्यातून बिया काढून शौचालयाच्या पाणी मध्ये धोतात आणि बिकतात हे सगळे बाजार आवारातून सडलेले भाजीपाला घेऊन त्याला मार्केट मध्ये असलेल्या शौचालयातील पाणी मध्ये धोउन मुंबई,ठाणे व नवी मुंबई परिसरात ग्राहकांना महाग दराने बिक्री करतात . व्हिडीओत तो स्पष्टपणे घाण पाण्यातील फणसाच बिया काढून धोतात दिसत आहे.यावेळी काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि मोबाइलमध्ये कैद केला. या घटनेमुळे आपण घेणारा भाजीपाला किती स्वच्छ आणि ताजा आहे हा प्रश्न सतावणारा आहे.
Share: