तुम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार,” नागपूर मध्ये कार्यकर्त्यांनी लावलं बॅनर .

4
0
Share:

नागपूर:विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला नागपूर येथे सुरुवात झाली  आहे. कालपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली. यामुळे विधीमंडळ सभागृह स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह तुम्ही पुन्हा येणार अशा आशयाचे फोटो लावले  आहेत.

नागपूरमध्ये काल पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. “आपल्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, तुम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार,” असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. तसेच या फोटोवर देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही कार्यकर्त्यांचेही फोटोही पाहायला मिळत आहे. नागपूर शहरातील भाजप आमदार आणि नेत्यांनी लावल्याची बोललं जात आहे. यामुळे सर्व ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहेत.

हिवाळी अधिवेशनचा दुसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादळी ठरणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत आणि कर्जमाफीची मागणी विरोधक लावून  धरणार आहे.

दरम्यान हिवाळी अधिवेशनाचा रणनितीबाबत महाविकासआघाडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला महाविकासआघाडीचे नेते आणि तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित राहणार आहे. शिवसेना पक्ष कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी ही बैठक होणार आहे.  शेतकरी मदत, कर्जमाफी या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

Share: