युवा शेतकऱ्यानं चक्क पुण्यात उभे केले काश्मीर ! सीताफळा सारख्याच पद्धतीने सफरचंदाची लागवड

18
0
Share:

युवा शेतकऱ्यानं चक्क पुण्यात उभे केले काश्मीर ! सीताफळा सारख्याच पद्धतीने सफरचंदाची लागवड

पुणे: शिरूर तालुक्यातील मुखई येथील अभिजीत धुमाळ या युवा शेतकऱ्यांना सगळ्यांनाच धक्का वाटेल असे कृत्य केलं आहे.सफरचंदाच्या बागा म्हंटल तर लगेच काश्मीरच चित्र उभ राहत.पण या युवा शेतकऱ्यांना सफरचंदाची लागवड चक्क पुणे जिल्ह्यात होत आहे.दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या हर्मन -99 या जातीच्या सफरचंदाला सध्या तिसऱ्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पर्यायाने सफरचंदासाठी काश्मीरचाही विसर पाडायला लावण्याचे काम आता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पुणे जिल्ह्यात शेतकरी करू शकतो.

अभिजीत हे स्वतः वेगवेगळे कृषी उपक्रम राबवत असतात.ऊसाच्या सर्व वाणांची बियाणे बनवण्याबाबत त्यांची कीर्ती राज्यभर आहे.या युवा शेतकऱ्यांन दोन वर्षांपूर्वी सफरचंद लागवडीचा विचार केला होता आणि त्याने हे करूनही दाखवले.हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागातील शेतकऱ्यांचे फोन नंबर मिळवून त्यानी संपर्क सुरू केला आणि इंटरनेट वरूनही बरीचशी माहिती गोळा केली.

तब्बल सहा महिन्यांत अभ्यास करून हर्मन -99 हा सफरचंदाचा वाण निवडून अगदी सीताफळा सारख्याच पद्धतीने त्याची लागवड केली.धुमाळ भावंडांच्या अनुभवाचा फायदा घेत,अन्य शेतकरीही हा प्रयत्न नक्कीच करतील अशी आशा व्यक्त केली.

Share: