डोंबिवलीत नामंकित कंपन्याच्या दुधात भेसळ कठोर कारवाईची मागणी
-डोंबिवलीत ३ महिन्यांपासून दुधात भेसळ सुरु
ठाणे: राज्यात भेसळ युक्त पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. यावर कठोरात कठोर कारवाई व्हायलाच हवी. दूध भेसळीची घटना डोंबिवली सारख्या शहरात झालीये त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. डोंबिवलीतील जिमखाना रोडवरील टेम्पो नाका परिसरातील मोहन प्लाझा या बिल्डिंगमध्ये मागील तीन महिन्यापासून दुधात भेसळ होत असल्याचे माजी नगरसेवक महेश पाटील यांना समजले होते. रविवारी पहाटे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत दूध भेसळीचा भांडा फोड केला आहे. तसेच यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली असता. टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुधात भेसळ करणाऱ्या रमेश मलप्पा गणपट्टी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सदर जागेवरून ४० लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत केले असून आरोपी रमेश मलप्पा गणपट्टी यांच्यावर कलम २६९,२७०,२७२ अंतर्गत कारवाई केली असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. दुधात भेसळ करणारा व्यक्ती हैदराबाद चा असून त्याने हा मुबंई येथिल अंधेरी भागात हे सर्व शिकलेला असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले. अश्या भेसळ युक्त दुधामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत होताय . दुधामध्ये भेसळ करणाऱ्याच्या विरोधात कठोरात कठोर शासन करावं आणि कठोर कायदा आणावा अशी मागणी करण्यात आली आहे.