सर्वात मोठी बातमी | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राजीनामा देणार… पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली ‘ही’ विनंती
सर्वात मोठी बातमी | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राजीनामा देणार… पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली ‘ही’ विनंती
नवी मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी यासंदर्भातील इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविल्याची दिली माहिती
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित   काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली.
या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही   माहिती दिली.  
"महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून.