धक्कादायक हापूसच्या नावाखाली केमिकल फवारणी करून कर्नाटकी आंब्यांची विक्री
धक्कादायक हापूसच्या नावाखाली केमिकल फवारणी करून कर्नाटकी आंब्यांची विक्री
-मुंबई APMC फळ मार्केट मधील धक्कादायक बातमी ग्-राहक देवगडचा आंबा समजून कर्नाटकचा आंबा खातोय  
-मुंबई APMC मार्केट मध्ये आंबा पिकवण्यासाठी केमिकल फवारणी
-आंबांच्या   फसवणुकीत ग्राहकांच्या जीवाशी खेळ
-संचालक आणि अन्न औषध प्रशासन जाणूनबुजून करतात दुर्लक्ष
नवी मुंबई :- उन्हाळा सुरु झाला कि आंब्यांचा मौसम सुरु होतो वर्षातून एकदाच हा हापूस आंबा चवीला मिळतो. आंबे खावे तर कोकणातलेच अनेकदा आपण देवदगड चा आंब्यांची पेटी खरेदी करतो पण पेटी मधला आंबा हा नक्की देवगडचा चा आहे का याची खात्री आपण कधी करत नाही या बाबत शंका देखील उपस्तित करत नाही. आंबा लवकर पिकवण्यासाठी केमिकलचा फवारणी करून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. मुंबई Apmc फळ मार्केटमधे तुम्ही आत प्रवेश केल्याने तुम्हाला प्रत्येक गाळ्यावर हापूस आंबाच्या पेट्या गळयामध्ये थप्पी लावून दिसणार मात्र यामध्ये नक्की हापूस आंबा आहेत का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.   आंबा हंगामात मुंबई apmc फळ मार्केट मध्ये जवळपास ६० टक्के व्यापारी   आपले गाळे भाडेतत्वावर दिले आहे   ,व्यपाऱ्याने एका   गाळ्यात २ ते ४ माणसे बसवले असताना महिन्यात २ ते ४ लाख रुपये भाडे वसुली करतात. सध्या फळ मार्केटमध्ये आंबाच्या हंगामात ४ महिन्यासाठी बंगाली टोळीने मार्केट काबीज केला आहे. सध्या देवगडचा हापूस आंबा हा ८०० ते १००० रुपये डझन तर कर्नाटक हापूस आंबा हा 80 ते 100 किलोंनी विकला जातोय. सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे 
रात्रीच्या वेळी   कॅरेट मधून कर्नाटकी कच्चे आंबे हे गळ्यात उतरवल्यानंतर देवगडच्या लाकडी आणि कागदी पेट्यांमध्ये इथरेलजी फवारणी करून देवगड हापूस आंबा पेटी तयार केली जाते आणि गाळ्यांमध्ये या पेटीचा साठा केला जातो यानंतर दोन दिवसांमध्ये हा हिरवागार आंबा पिवळा धमक होतो.त्यानंतर लगेच याची विक्री केली जाते. हा खेळ संपूर्ण रात्रभर गळ्याच्या अवती भवती सुरु असतो . ग्राहकांना देवगडचा च आंबा हवा पण देवगडच्या आंब्यांची आवक कमी असल्याने apmc मार्केट मधील देवगड आंब्यांच्या   पेटित कर्नाटकी आंबा भरून ग्राहकांची फसवणूक केली जाते.
इथरेलद्वारे पिकवलेला आंबा हा वरुन पिवळा दिसतोय. वरवर पाहता हा आंबा आकर्षक दिसतो. मात्र याची चव तुरट आंबट लागते. चवीसोबतच नागरिकांच्या आरोग्यासोबतचही खेळ केला जातोय. रायपनिंग चेम्बर मध्ये इथरेलच्या फवारणीसाठी मान्यता आहे परंतु तयार आंब्यावर केली जाणारी केमिकलची फवारणी अत्यंत घातक आहे .यावर   संचालक आणि अन्न   औषध प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे.   हा आंबा खाल्ल्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे, गुंगी येणे, झोप लागणे आणि मानसिक तणावासोबतच चेतनासंस्थेवर परिणाम होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे तुम्ही तर आंबा खरेदी करताना चौकशी करूनच खरेदी करा.