Big Breaking: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी, ‘या’ नेत्यांना संधी, राष्ट्रवादीला स्थान नाही?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अखेर लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारातील 3 मंत्र्यांची नावे ‘
खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली   आहे. तसेच चौथ्या मंत्रीपदासाठी शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये चुरस असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले की भाजप आणि शिवसेनेत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती दिली. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी 7 मंत्री शपथ घेणार असल्याचं गोगावले यांनी सांगितलं. तसेच विस्तार कधीही होऊ शकतो, आम्हाला तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अस गोगावले यांनी सांगितलंय. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारातील तीन मंत्र्यांची नावे खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे. चौथ्या नावासाठी संजय शिरसाट आणि योगेश रायमूलकर यांच्यामध्ये चुरस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थान मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येत्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटाकडून 8 ते 10 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय शिरसाट यांना मंत्रिपद दिल्यास शिंदे गटाकडून मराठवाड्याला तिसरं मंत्रीपद मिळेल. त्यामुळे विदर्भाला प्राधान्य देण्यासाठी संजय रायमूलकर यांना संधी मिळू शकते, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे
मंत्रिमंडळ विस्ताराची लवकरच घोषणा होणार
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत गेल्या वर्षभरापासून सातत्याने चर्चा होतेय. महाराष्ट्रात सत्तांतरानंतर पहिल्या टप्प्यातील विस्तार पाडला होता. त्यावेळी शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता वर्षभराने राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार पार पडणार आहे. राज्य सरकारकडून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.