सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोयाबीन दरवाढ सुरूच
गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन सहा हजाराच्या आसपास स्थिर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. लातूरच्या बाजारात सोयाबीनचे भाव वधारले असल्यामुळे शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. गुरूवारी सोयाबीनला ७ हजार ४६० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. सध्याच्या हंगामातील हा सर्वात उचांकी भाव आहे. गुरूवारी दिवसभरात ११ हजार ९७१ क्विंटल सोयाबीनची लातूरच्या आडत बाजारात आवक झाली आहे . गेल्या तीन महिन्यांपासून सोयाबीन सहा हजाराच्या आसपास स्थिर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती.