मुंबई APMC फळ मार्केटमध्ये परदेशाच्या सफरचंद दाखल ;काश्मीर सफरचंदाची दरात घसरण
 
-परदेशाच्या   सफरचंदमुळे काश्मीर आणि हिमाचल   सफरचंदाची दारात मोठा घसरण
-परदेशाची   सफरचंद १०० ते १३० तर काश्मीर सफरचंद ८० ते १०० रुपये प्रतिकिलो
-बाजार आवरत परदेशाच्या ब्लूबेरी बरोबर भारताच्या ब्लूबेरी सुद्धा दाखल
Mumbai Apmc Fruit: मुंबई APMC फळ मार्केटमध्ये सध्या परदेशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. सफरचंद खायला गोड रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक त्यामुळे परदेशाच्या सफरचंदाची मागणी वाढली असून काश्मीर सफरचंद पडून राहिले आहे .मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये सध्या इराण ,तुर्की ,वॉशींगटोन ,अफगाण असे ७ ठिकाणातून   सफरचंदांची मोठा प्रमाणात आवक सुरु झाली आहे .परदेशाच्या सफरचंद १०० ते १४० रुपये प्रति किलो तर काश्मिरी सफरचंद   ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. मात्र, असे असताना देखील परदेशाची सफरचंदला अधिक मागणी असून काश्मिरी सफरचंद मार्केटमध्ये विक्रीविना पडून असल्याची माहिती फळ मार्केटचे व्यापारी शिव कुमार यांनी सांगितले आहे .