मुंबई APMC दक्षता पथकाकडून मोठी कारवाई ; सेस न भरल्यामुळे 200 कंटेनरवर कारवाई , “तूर” आयातदारावर 1 कोटी 11 लाख 48 हजार रुपयांचा दंड !

-दक्षता पथकाकडून बिना लायसन्स शेतमालाची आयात ,निर्यात व अनधिकृत   व्यापार करणारे एका आयातदारचा 200
कंटेनरवर कारवाई*
- बाजार समितीच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाई
Tur Import Tax: आताची   सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.मुंबई एपीएमसी दक्षता पथकाने गुरुवारी मोठी कारवाई करत बिनपरवाना व बाजारसमितीचा सेस न भरल्यामुळे आयातदाराचा “तूर”चा   कंटेनर परस्पर विक्रीसाठी घेऊन जात असताना जप्त केला आहे .या आयातदाराने बाजारसमितीकडून   कोणतीही परवानगी घेतलेले नाही . तब्बल 200 कंटेनर मधे 5000 टन “तूर “ दुबईमधून आयात केल्यावर नावाशेवा येथील एका कंटेनर गोदमात ठेवण्यात आला आहे   .या तुराची अंदाजे किंमत 34 कोटी 60 लाख रुपये असून यावर 1 कोटी 11 लाख 48 हजार रुपये दंड बाजार समिती प्रशासनाकडून वसुली करण्यात येणार आहे .
बाजार समितीच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाई मानले जात आहे .सदर कारवाई मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या   दक्षता पथकाकडून करण्यात आली आहे . बाजार समितीचा कार्यक्षेत्रात बिना लायसन्स व सेस न भरता मोठ्या प्रमाणात शेतमालाचा अनधिकृतपणे आयात करणाऱ्या एका आयातदारावर कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईची पार्श्वभूमी
29 मे 2025 रात्री 8 बाजता   मुंबई एपीएमसी दक्षता पथकाने बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील JNPT, तुर्भे, नेरुळ, ठाणे-बेलापुर रोड, नवी मुंबई, परिसरात अनधिकृत शेतमालाच्या वाहनांची तपासणी करत असताना उरण -JNPT येथील   वहाळ फाटा येथे परदेशातून आयात करण्यात आलेला "तूर" हा शेतमाल घेऊन जाणाऱ्या   वाहन (कंटेनर) जात असल्याची माहिती दक्ष्ता पथकाला मिळाली .त्यानंतर पथकाने वाहन क्रमांक एमएच ४८ टी ८१५६ हे तपासणी केला असताना या कंटेनरमधे परदेशातून आयात करण्यात आलेला तूर मिळाली .अधिक चौकशीअंती समजले की सदर शेतमाल हा मे. अग्ग्लो कमोडीटीस, FZE , जीबलअली, फ्री झोन, दुबई   येथून पाठवण्यात आली आहे . सदर बिलानुसार तुरीचा   शेतमाल मुंबई येथील मे. नमहा इंपोर्ट्स यांचे नावाने   एकुण 200 कंटेनरची आयात झाल्याचे कागदपत्रावरुन दिसून आली आहे.
या आयातदाराने   आयात केलेल्या शेतमाल बाजार समितीच्या   कार्यक्षेत्रात ठेवण्यापूर्वी बाजार समितिकडून कोणतीही अधिकृत   परवाना घेतला नाही तसेच त्याचे नावे बाजार सामितीचे आयातदार लायसन्स सुधा नाही. सदर वाहनाच्या वाहन चालकाकडे वाहनातील शेतमालाची व कागदपत्रांची मागणी केली असता सदर वाहन धारकाने दिलेल्या बि .एल क्रंMEDUAC०५३४४७ या कागदपत्रांवरुन त्या कन्साईनमेंटमध्ये जवळपास 5000 टन ‘तूर’   असून सदर शेतमालाची एकूण किंमत 34 कोटी 60 लाख रुपये बोलले जात आहे .बाजार समिती प्रशासनाने सदर आयातदारावर तीन पट्ट 1 कोटी 11 लाख 48 हजार दंड मारून वसुली करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई एपीएमसी सचिव डॉ.पी .एल खंडागले यांनी दिली आहे.
 
 
बाजार फी, देखरेख खर्च न भरता बाजार   समितीच्या कार्यक्षेत्रात व्यवहार करत असल्याचे दक्षता पथकाना आढळून आल्यामुळे सदर वाहन ताब्यात घेवून मुख्यालयात जमा करण्यात आली आहे . सदर वाहन आयातदाराने शेतमाल बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आणण्यापूर्वी पूर्व सूचना न देता आणलेला असल्याने सदर आयतदाराचा बाजार फी व देखरेख खर्च चुकविण्याचा हेतु होता याबाबत खात्री झाल्याने सदर वाहनावर महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम १९६३ मधील कलम ३२ मधील ९अ आणि क अन्वये ३ पट दंड आकारण्याची कार्यवाही करून बाजार फी, देखरेख खर्च व अनुषंगिक खर्च वसूल करण्यात येणार आहे. 
सदर कारवाई मुंबई एपीएमसी सभापती प्रभू पाटील ,उप सभापती हुकूमचंद आमधारे यांच्या आदेशाने मुंबई एपीएमसीचे   सचिव डॉ.पी .एल .खंडागले यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथकाचे उप सचिव महेश साळुंके पाटील ,अनंत पारदुले , संजय   खांडेकर , अजित नारंगकर, विनीत उबाळे यांनी कारवाई केली आहे.  
ही कारवाई म्हणजे बाजारसमितीला सेस न भरता व्यापार करणे बेकायदेशीरपणे आयात करून शेतमालाची विक्रीविरुद्धचा एक ठोस पाऊल आहे .बाजार समितीचा उत्पन्न वाढीसाठी असे कारवाई होणे आवश्यक आहे .दक्षता   पथकाने दाखवलेली तत्परता आणि दक्षता यामुळे भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील ,यात शंका नाही त्यामुळे व्यापाऱ्यांनी अश्या प्रकारे अनधिकृत पणे व्यापार आयात निर्यात करण्यापेक्षा बाजार समितीची लायसन्स घेवून   व्यापार करावा असे आवाहन एपीएमसी प्रशासनाकडून करण्यात आली आहे ..