BIG BREAKING | गौतम अदानी यांनी घेतली शरद पवार यांची भेट, दोन तास चर्चा; मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चा तर होणारच
मुंबई : काँग्रेसने ज्या उद्योगपती गौतम अदानी यांना टार्गेट केलं आहे. त्याच गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. चर्चा काय झाली हे गुलदस्त्यात आहे. मात्र, शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीने मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चाना उधाण आलं आहे. या भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहे.