कांदा लागवड यंत्रापाठोपाठ; आता खत विस्कटणी यंत्र शेतकऱ्यांच्या भेटीला
२१ व्या शतकात शेतीमध्ये अनेक आमूलाग्र बदल घडून आले आहेत. तसेच शेतीमध्ये यंत्र सामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी वेळात शेतीमधील जास्त काम हे यंत्रसामग्री मुळे शक्य झाले आहे. आता शेतीमधील विविध कामासाठी विविध वेगवेगळ्या प्रकारची अवजारे निर्मित झाली असल्यामुळे पेरणी नांगरणी काढणी इत्यादी कामे क्षणार्धात होतात. यामुळे अत्यंत कमी वेळात शेतातील कामे होऊ लागली आहेत.
शेतामध्ये यंत्रसामग्री काळाची गरज बनली आहे. त्यामुळे यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे शिवाय योग्य वेळी शेतात राबण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे तसेच वाढत्या मजुरीमुळे शेतकरी वर्गाला मजूर लावणे परवडत नसल्याने सर्व शेतकरी यंत्राचा अवलंब करू लागले आहेत. तसेच योग्य वेळेत आणि कमी वेळेत जलद गतीने कामे होत असल्याने शेतकरी वर्गाला यंत्रणा फायदेशीर ठरते आहे.
आता उन्हाळ्याच्या तोंडावर सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये खत घालायला सुरवात करतात. खताची भरणी होते परंतु विस्कटणी साठी मजूर मिळत नसल्यामुळे बऱ्याच वेळा कामे लांबणीवर जातात. परंतु खत विस्कटणी चा त्रास आणि चिंता कमी झाली आहे कारण आता बाजारात खत पांगवण्यासाठी यंत्र आले आहे. या यंत्राच्या मदतीने आपण शेतामध्ये कमी वेळेत खत पांगवणी करू शकतो.
सध्या बाजारात खत पांगवणी साठी यंत्र आले आहे. हे शेतकरी वर्गासाठी खूपच फायदेशीर ठरते आहे. दीड तासांमध्ये हे यंत्र 1 एकर क्षेत्रावर खताची विस्कटणी करता येत आहे. तसेच 1 एकर खत विस्कटणी साठी 700 ते 800 रुपये पर्यंत खर्च येतो. अत्यंत कमी वेळात जलद काम होत असल्याने शेतकरी वर्ग या यंत्राला पसंती देत आहे.