रोजच्या जीवनात विविध भाज्यांचे सेवन आपण करतोच पण त्यातील भेंडी चे विविध फायदे जाणून घ्या
१) तजेलदार त्वचा – भेंडीत व्हिटॅमिन ए, सी प्लोएट आणि कॅल्शियम असतं. भेंडीच्या सेवनानं त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते. यासाठी ऑर्गेनिक ओरका पावडर यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्याला लावा. यानंतर गरम पाण्यानं चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून 2 वेळा हा फेसपॅक वापरा.
२) केसांची निगा – भेंडीच्या सेवनानं शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. यातून तुमच्या केसांची निगा राखण्यासाठीही खूप फायदा होतो.
3) मधुमेह – ज्यांना मधुमेह आहे अशांना फायबरयुक्त पदार्थांची शिफारस केली जाते. भेंडीत पुरेशा प्रमाणात फायबर असतं. भेंडीत मायरीसेटीन देखील आहे. यामुळं रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
4) कोंडा – भेंडीमुळं तुमच्या केसांच्या कोंड्याचा त्रासही दूर होतो. केसांचा इचीनेस आणि त्यांच्या ड्रायनेसची समस्याही दूर होते.
5) पचनशक्ती – भेंडीच्या सेवनाने अनेक समस्या जसे की, मळमळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि जास्त गॅस अशा समस्या टाळल्या जाऊ शकतात. यामुळं तुमची पचनशक्ती वाढून ती चांगली राहण्यास मदत होते.
6) दृष्टी – भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळं तुमची दष्टी चांगली राहते. यामुळं मोतीबिंदूपासूनही तुमचा बचाव होतो.
7) हृदय – भेंडीच्या सेवनानं हृदय निरोगी आणि स्वस्थ राहतं. भेंडी पॅक्टीन कोलेसट्रॉलला देखील कमी करण्यास मदत करते. .यातील विरघळणारे फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतात. यामुळं हृदयरोगाचा धोका कमी होतो.
8) चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा पुरळ – भेंडीत असणारं लिसलिसा जेल अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, एनालजेस्टीक, अँटीइंफ्लेमेटरी आणि रि हायड्रेटींग असतं. भेंडीच्या सेवनामुळं चेहऱ्यावरील पिंपल्स आणि पुरळ कमी होतात.
हे आहेत भेंडीचे विविध फायदे पण काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळा. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काही करू नका.