इराण–इस्रायल युद्धाचा फटका. मुंबई APMC मध्ये सफरचंद दर ४५० पर्यंत, साठवणुकीचा खेळ उघड
एपीएमसी न्यूज नेटवर्क:
इराण–इस्रायल युद्धाचा परिणाम आता मुंबईतील फळबाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. मुंबई APMC होलसेल फळ मार्केटमध्ये सफरचंदांच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे.
निर्यात बंद झाल्यामुळे कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवलेली सफरचंदे आता बाजारात दाखल होत आहेत. पूर्वी सुमारे १५० ते २५० रुपये किलो दराने विकली जाणारी सफरचंदे सध्या घाऊक बाजारात २५० ते ४५० रुपये किलो दराने विकली जात आहेत.
दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. युद्धाच्या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यापारी कोल्ड स्टोरेजमध्ये माल साठवून ठेवत असून, बाजारात नियंत्रित पुरवठा करून दर वाढवत असल्याचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने लक्ष घालून साठेबाजीवर कारवाई करावी आणि दर नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.