Ajit Pawar Last Speech | “बोलवणं आल्यावर प्रत्येकाला जायचंच असतं” – अजित पवार यांच्या बारामतीतील भाषणाचा व्हिडिओ व्हायरल
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील एका भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अपघाताच्या ४ दिवसांपूर्वी बारामतीत अजित पवारांचे शेवटचे भाषण झाले. “हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही-आम्ही आज असू, उद्या नसू. नियतीपुढे बोलवणं आलं, की प्रत्येकालाच जायचं असतं,” असे शब्द या भाषणात उच्चारले होते..त्यामुळे आता नवीन पद्धतीने शेतकरी आपल्या शेतात काय काय पिकवणार आणि कमी खर्चात कसे जास्त पैसे मिळणार यासाठी दादा सांगत होते .या भाषणात अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचे मार्गदर्शन केले. बदलत्या काळात शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन नवनवीन पिकांची निवड कशी करावी, कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर विचार मांडले.
दरम्यान, हे शब्द आणि त्यानंतर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ पाहताना अनेकांचे मन हेलावून टाकणाऱ्या भावना व्यक्त होत आहेत. अजित पवारांच्या या भाषणामुळे जीवनातील अनिश्चिततेची जाणीव पुन्हा एकदा प्रकर्षाने होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहेत.