पुणे APMC मार्केटचा पाहणी दौरा - शेतकरी प्रतिनिधी यांच्या ‘ स्टिंग ऑपरेशन’ मुळे मार्केट संचालकांची पोलखोल.
Apmc Director News : मुंबई APMC भाजीपला व फळ मार्केटच्या संचालकानी   काही व्यापाऱ्यांना सोवत घेवून पुणे बाजार समितीचा पाहणी दौरा केला, सदर पाहणी दौरा भाजीपला मार्केट संचालक शंकर पिंगळे व फळ मार्केट संचालक संजय पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला . त्यामुळे बाजार समितीच्या   उत्पन्नवाढीसाठी पाहणी दौरा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे . यावेळी पुणे APMC सभापती दिलीप कालभोर   भाजीपाला व फळ मार्केटच्या   व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी गणेश घुले ,पुणे apmc सचिव राजाराम दौंडकरसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .   मात्र आम्ही तुम्हला सांगणार आहोत या पाहणी दौराच्या मागचे कारण काय .
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ३ ऑगस्ट रोजी सदस्य समितीची   सभा झाली होती. भाजीपाला मार्केटमध्ये येणाऱ्या शेतमालाची गेटवर नोंद नसल्याची माहिती स्टिंग ऑपरेशन करणार्या शेतकरी प्रतिनिधीनी दिली. सदर स्टिंग ऑपरेशन या सभेमध्ये दाखवण्यात आले, त्यावेळी शेतकरी प्रतिनिधी यांनी   सांगितले   कि पुणे ,नाशिक ,नागपूर मार्केटमध्ये गेटवर ज्या प्रमाणे CCTV व संगणकीकरण झाले आहे त्याप्रमाणे मुंबई apmc भाजीपला व फळ मार्केटमध्ये देखील करावे अशी चर्चा झाली.   त्यानुशंगाने मुंबई APMC भाजीपाला मार्केट संचालक व फळ मार्केट संचालक यांनी काही व्यपार्यांना सोबत   घेउन पुणे APMC मार्केटचा पाहणीदौरा केला ,
आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये राज्य आणि परदेशातून   शेतमाल येत असतो , या बाजारपेठ मध्ये विविध राज्याचे अधिकारी आणि प्रतिनिधी येतात ,मार्केटमध्ये कशा पद्धतीने कामकाज चालत याचा ते पाहणी दौरा करतात आणि आपल्या मार्केट मध्ये जाउन अंमलबजावणी करतात ,मात्र अशा या मोठ्या बाजारपेठेमधून जाउन लहान बाजारपेठमध्ये शिकायची वेळ संचालकांवर का आली?   यावर संचालकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया पाहणीदौऱ्यातील एका व्यपाऱ्यानी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.   भाजीपाला व फळ मार्केटचे विद्यमान   संचालक जवळपास   १० वर्षांपासून व्यपाऱ्याचे प्रतिनिधित्व करतात दोन्ही संचालक राज्यात आणि परदेशात जाऊन शेति व तेथील बाजार समितीचा पाहणी दौरा करतात ,दोन्ही संचालकांना चांगले अनुभव असताना त्यांच्या मार्केटची स्थिती   अत्यंत बिकट असल्याचे चित्र दिसून येत आहे .
भाजीपाला आणि फळ मार्केटचा अनागोंदी कारभार लपवण्यासाठी मार्केट संचालकांनी काही व्यपाऱ्याना घेऊन पुणे   कृषी उत्पन्न बाजार समितीचा   पाहणी दौरा केल्याची चर्चा बाजार आवारात सुरु झाली आहे . पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या   कारभार अत्यंत शिस्तबद्ध चालतो ,या मार्केटमध्ये खाजगी वाहनला प्रवेश नाही ,वाहेरून येणाऱ्या शेतमाल गाडयांना धक्क्यांवर शेतमाल रिकामा करून व्यवस्थित पार्किंग केलं जात , मार्केटमध्ये पदपथावर कुठल्याही प्रकारचा स्टॉल नाही ,बाहेरून येणाऱ्या शेतमालाच्या गाड्यानी आत प्रवेश केला कि त्यांना कुठल्या विंग मध्ये जायचं यासाठी लांबून फलक लावण्यात आले आहेत ,सर्वात महत्वाची बाब अशी आहे कि पुणे APMC मार्केटच स्लोगन 'माझा सेस माझी जबाबदारी' असं आहे.
मात्र दुसरीकडे मागच्या १० वर्षापासून भाजीपला व फळ मार्केटमध्ये प्रतिनिधित्व करणारे हि दोन्ही संचालक यांच्या मार्केटची स्थिती   पहिली तर मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा   शेतमाल विकण्यासाठी जागा नाही ,जवळपास ५० ते ६० टक्के व्यापाऱ्यांनी आपले गाळे भाड्याने दिले आहेत, एका गळ्यात ४ ते ५ फेरीवाल्याना बसवून अवैध शेतमालाचा व्यापार . यामध्ये शेतकरी , व्यापारी ,ग्राहक व बाजार समितीला मोठ्या प्रमाणात नुकसान. मार्केट संचालकांसोबत जवळपास २००० व्यपाऱ्यानी महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल आहे यांची तक्रार स्वतः बाजार समितीने महापालिकेला केली आहे ,   गाळ्यामध्ये भाडेतत्वावर वास्तव करणाऱ्या मजुराकडून भाडे वसुली ,मार्केटच्या फुटपाथ आणि रस्त्याच्या मध्ये स्टॉल वाटप ,ज्यामुळे वाहेरून येणाऱ्या शेतमालाचा गाडयांना नाहक त्रास . सर्वात महत्वाची बाब अशी कि फळ मार्केटमध्ये गाड्याची आवक मधून सेस वसुली होत नसून बाजार आवारातील ठिक ठिकाणी विंग मधे असणाऱ्या चौकीतून दररोज सेस जमा केला जातो ,मात्र   इतर मार्केटमधे महिन्या संपल्यानंतर व्यापाऱ्याकडून आकारणी करुन सेस जमा केला जातो ,त्यामुळे एकच बाजार समितीमध्ये दोन प्रकारे धोरण का   ? एकंदर पाहिलं तर भाजीपाला व फळ मार्केटचे धर्मशाळेमध्ये रूपांतर झाले आहे . यावर   मार्केट संचालक जाणून बुझून गप्प आहेत का ? बाजार आवारात सावकारी मुळे बरेच व्यापारी कर्जबाजारी आहेत . मार्केटची परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे ,आणि हे सर्व मार्केट सध्या कार्यरत असलेल्या संचालकांच्या देखरेख खाली सुरू आहे .त्यामुळे संचालक मंडळांनी आपले मार्केट कसे शिस्तबद्ध चालेल, ज्यामुळे शेतकरी, व्यापारी, मजदूर ग्राहकाना फायदा होईल आणि बाजारसमितीचे उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे.