MAHARASHTRA BUDGET 2022: शेतकरी आणि बाजार समितीसाठी या अर्थसंकल्पात काय? वाचा सविस्तर
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी सरकारकडून २५० कोटी रुपयांची तरतूद.
राज्याचा विकास अधिक गतीमान करण्यासाठी विकासाची पंचसुत्री राबणार. येत्या तीन वर्षात या कार्यक्रमासाठी ४ लाख कोटी उपलब्ध करून देईल.
महाराष्ट्र देशातील १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य ठरेल
कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे. या क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद केली आहे. ६ मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय भाषणात नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली होती. आर्थिक अडचणींमुळे रक्कम देता आली नाही
शेतकऱ्यांना दिलेल्या वचनांची पूर्तता नवीन आर्थिक वर्षात केली जाईल. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे आभार. या अनुदानाचा लाभ २० लाख शेतकऱ्यांना होणार. यासाठी २०२२-२३ मध्ये १० हजार कोटी खर्च अपेक्षित
भूविकास बँकेच्या ३४ हजार ४८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा सरकारचा निर्णय
भूविकास बँकेच्या ३४ हजार ४८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा सरकारचा निर्णय
२०२१-२२ च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवण्याची घोषणा केली होती. यामुळे पीक कर्ज वाटपात वाढ झाली आहे. २०२२-२३ मध्ये ४३,१२ लाख शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल
हिंगोली येथील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात येईल. हळद पिकावर संशोधन केलं जाईल, त्यासाठी १०० कोटींचा निधी
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करणार. शेततळ्यांचा समावेश केला जाणार आणि शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत ५० हजारांची वाढ
महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली तरतूद वाढवून ५० टक्के करण्यात येणार. कृषी विभागाच्या योजनांमधील ३ टक्के निधी आजी-माजी सैनिकांना उपलब्ध करून दिला जाणार
अन्न व कृषी मालाच्या प्रक्रियेसाठी योजना राबवली जाणार. दापोली येथील बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ५० वर्ष पूर्ण होत असल्यानं संशोधनासाठी ५० कोटींचा निधी
३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पायाभूत सुविधासाठी घेतलेल्या कर्जाऊ व्याजाची शंभर टक्के परतफेड सरकार करणार. यासाठी पुढील दोन वर्षात १० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित
राज्यात २७० सिंचन प्रकल्प प्रगती पथावर आहेत. याद्वारे ३१७ टीएमसी पाणीसाठी निर्माण होईल
बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत मंजूर प्रकल्पांपैकी २०२२ पर्यंत २८ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. २० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झालं आहे.
घोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी २०२२-२३ साठी ८५३ कोटी ४५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार
उस्मानाबाद, गडचिरोली आणि नंदूरबार या जिल्ह्यात वाशिम जिल्ह्याच्या धर्तीवर पाझर तलावांचे साठवण तलावात रुपांतर करण्याची योजना राबवणार
मनरेगा योजनेतून ४३ हजार ९०२ सिंचन विहीरींची कामे हाती घेण्यात आली आहेत
फळबाग लागवडी योजनेत केळी, ड्रॅगनफ्रूट, द्राक्षे तसेच अन्य मसाला पिकांचा समावेश करण्यात येत आहे
बैलघोडा हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध असलेल्या रुग्णालयाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी इमारतीच्या देखभालीसाठी २०२२-२३ मध्ये १० कोटी दिले जाणार.
बैल घामांची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतिक, बैल माझ्या शिवारात काढे हिरवे स्वतिक.
बैलगाडा शर्यतीची शासनाने परवानगी मिळवली. देशी गाई-म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी तीन मोबाईल प्रयोगशाळा तयार करण्यात येतील.
गेल्या दोन वर्षांपासून आपण कोविडशी सक्षमपणे लढत आहोत. ८ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील ८ कोटी ७४ लाख व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ६ कोटी ७८ लाख व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्याचबरोबर १५ लाख ८७ हजार व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात आला आहे.