मुंबई APMCच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट ?
मुंबई APMCच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट ?
- बाजारातील जीर्ण बांधकामासाठी बिल्डरांसोबत पार्टनरशिप
- मसाला मार्केट खड्यात,मार्केट संचालक   बिल्डरच्या अड्ड्यात
नवी मुंबई : विकासाच्या मार्गात कुणालाही अडथळा आणू देणार नाही. त्यामुळं माफ करा. थोडं स्पष्ट बोलतो. टक्केवारीकरिता प्रकल्प अडकवून ठेवणे हे खपवून घेतलं जाणार नाही. यामध्ये कुणीही असलं तरी… लोकप्रतिनिधी असतील,तर मुख्यमंत्र्यांना सांगा. अधिकारी असतील, तर लोकप्रतिनिधींना सांगा. पण, हे सगळे धंदे यातले बंद झाले पाहिजेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसावलं होते मात्र मुंबई APMC मार्केट मधील कांदा बटाटा आणि मसाला मार्केट पुनर्बांधणीच्या नावावर, बांधकामात टक्केवारी देऊन ,पुनर्बांधणीचा भार खाजगी बिल्डरांच्या खांद्यावर टाकून ,बाजारातील मोक्याच्या जागा एक प्रकारे बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याची चर्चा   बाजार समिती वर्तुळात सुरु झाली आहे.
मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ,मुंबईतील बाजार समिती १९८० च्या दशकात नवी मुंबईत टप्प्याटप्याने स्थलांतरित झाली. या बाजार समिती मध्ये , पाच स्वतंत्र बाजार आहेत. कांदा बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला आणि धान्य मार्केट. या पाच हि बाजार आवारात व्यापारी गाळ्यांप्रमाणे, सोइ सुविधनसाठी प्रशासकीय सुविधा इमारती हि आहेत. या बाजारातील सर्व जागेची मालकी हि फक्त बाजार समितीची आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे. व्यापाऱ्यांसाठी सोइ सुविधा उभारणे हे   बाजार समितीचे ,मुख्य काम आहे. त्यानुसार बाजार समितीच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीवर बाजार समिती वेगवेगळे उपक्रम राबवत असते. व्यापाऱ्यांसाठी सुविधा इमारत उभारणे, शेतकऱ्यांसाठी शेतकरी कक्ष उभारणे, व्यापारत्यांसाठी, निर्यातदारांसाठी निर्यातगृह बांधणे, अशी कामे हि बाजार समिती करत असते.पूर्वीच्या संचालक व काही अधिकाऱ्यांचे संगनमताने बाजार समितीच्या   जागे कौडीच्या दराने बिक्री करण्यात आले आहे आता शिल्लक जागेवर काही संचालकांनी बिल्डरच्या   घशात घालण्याचं प्रयत्न सुरु केली आहे.
मात्र सध्या   बाजार समिती मध्ये   बाजाराच्या पुनर्बांधणीचा विषय चांगलाच गाजत आहे. यात तर पहिल्यांदा कांदा बटाटा बाजाराच्या पुनर्बांधणीचा विषय गेल्या २० वर्षांपासून सुरु आहे.हे मार्केट आपने आप को रो रहा हे,यापूर्वी बऱ्याच बिल्डर सोबत बैठक झाले मात्र टक्केवारीमुळे पूर्ण झाली नाही असे चर्चा बाजार आवारात सुरु आहे, तो आता परत पुनर्बांधणीचा मुद्द्यावर येऊन थांबला आहे.मार्केटचे पुनर्बांधणीत बांधकाम बिल्डर करून देणार आहे. बांधकामाचा खर्च तोच उचलणार आहे. , त्या बदल्यात बाजारातील बांधकामात त्याला टक्केवारी दिली जाणार आहे. हि टक्केवारी   म्हणजेच भागीदारी ४० टक्क्यापर्यंत असणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आत्ता ज्या जागेची , बांधकामाची   शम्भर टक्के मालकी बाजार समितीची आहे. तिच्यात बांधकाम व्यवसायिकाची भागीदारी होणार आहे.  
अशीच परिस्थिती मसाला बाजारात हि आहे. मसाला बाजारात असलेली   मध्यवर्ती सुविधा धोकादायक झालेली आहे. त्यामुळे हि   इमारत पाडून   त्या जागी नवीन अत्याधुनिक इमारत बांधण्याचा निर्णय झाला आहे.   त्या संदर्भातील प्रस्ताव हि सभेत मंजूर करण्यात आलेला आहे. प्रस्तावच्या अगोदर मार्केट संचालक यांनी सभापती आणि उप सभापतीला घेउन विकासक यांच्या घरी गेले होते यांची चर्चा बाजार आवारात चांगलं गाजले होते. आता इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी त्या विकसकाशी बोलणी सुरु झाली आहेत. त्या विकसकाने या ठिकाणी १० मजल्याची इमारत बांधून देण्याची तयारी दर्शवली असून त्या ऐवजी या ठिकाणी आपल्या आईच्या नावे, याच इमारती मधील दोन मजल्यावर हॉस्पिटल बांधण्याची अट घातली आहे. आणि यासाठी बाजार समिती मधील घटक तयार हि झाले आहेत.सूत्राने सांगितले प्रमाणे मार्केटच्या पुनर्बाधणीसाठी   ज्या विकसकाला मार्केट संचालक ,सभापती आणि उप सभापती आणायला उत्सुक आहेत त्या विकासकावर फसवणुकीच्या गुन्हा दाखल असून   ३ महिने तुरुंगात जाऊन आले आहे असे विकासक मार्केट मध्ये आले तर नक्की विकास कोणाचा होईल ?
बाजार समितीची जागा हि सध्याच्या घडीला अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा आहे. इथून हायवे जवळ आहे रेल्वे स्थानक जवळ आहे. शहराच्या अगदी मधोमध असल्याने या जागेला सध्या कोटींचा भाव आहे. असे असल्याने अनेक विकसकांचा डोळा बाजार समितीच्या या जागांवर आहे. मात्र बांधकाम व्यवसायिकांच्या भागीदारीमुळे बाजार समितीच्या जागा मात्र बिल्डरांच्या घशात जात आहेत असा आरोप काही सजग बाजार घटक करत आहेत. 
बाजाराच्या पुनर्बांधणीचा विषय हा संचालक मंडळ घेत आहे, व्यापारी आणि बाजार समिती   पैसे टाकून दोघे मिळून बाजाराची उभारणी करू शकते. मात्र बिल्डरला जागा देऊ यात आणि फुकटात बांधकाम करून घेऊयात असे सूत्र वापरून बाजार समितीमध्ये पुनर्बांधणी करण्याचा हा प्रकार आहे. यामुले अन एक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
व्यापारी आणि बाजार समिती मिळून बाजाराचा विकास करू शकते मात्र असे असताना बांधकाम खर्चाचा भार बिल्डराच्या खांद्यावर टाकून त्याला बांधकामात टक्केवारी देऊन हे बांधकाम करण्याची तयारी केली जात आहे. यामुले आता ज्या जमिनीची मालकी फक्त बाजार समितीची आहे तिच्यात ,पुनर्विकासानंतर बिल्डरचीही मालकी वाढणार आहे. त्यामुले बाजार समिती हा हक्क असलेल्या जागेवर सभापती आणि या संचालकांमुळे खाजगी बिल्डरांचा हि हक्क वाढणार आहे आणि हे बाजार समितीसाठी ,शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचे काही व्यापारी सांगत आहेत.