बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतोय, मग हे जरूर वाचा
धावपळीच्या जगात जीवनशैलीतील बदल आणि चुकीच्या आहार शैलीमुळे विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठता, पोट फुगी तसेच अपचन यासारख्या समस्यांनी अनेक व्यक्ती त्रस्त होतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येला महत्व दिले जात नाही. आयुर्वेदात बद्धकोष्ठतेला रोगांचे प्रवेशद्वार मानले जाते. बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे पचनसंस्थेशी संबंधित मोठ्या विकारांना सामारे जावे लागू शकते. बद्धकोष्ठतेमुळे पाठीत चमक आल्यामुळे फेफरे किंवा आम्लपित्ताची समस्या निर्माण होते. बद्धकोष्ठतेच्या समस्यांवर औषधांचा मार्ग अनेकजण टाळतात. मात्र, आयुर्वेदिक उपाय आजमाविल्यास बद्धकोष्ठतेवर समूळ मार्ग नक्कीच निघू शकतो.
मैदायुक्त पदार्थांचे अतिसेवन, अतितेलयुक्त किंवा मसालेदार पदार्थांचा जेवणात समावेश, आहारात पौष्टिक पदार्थांचा अभाव, जेवणाच्या अनियमित वेळा,
रात्री उशीराने आहार, अत्यल्प पाण्याचे सेवन, अधिक प्रमाणात चहा-कॉफीचे पेयपान, प्रतिजैविक औषधांचा अतिवापर या सर्व बाबींमुळे बद्धकोष्ठतेसाठी कारणीभूत आहे.
बद्धकोष्ठतेवर घरगुती स्वरुपाचा रामबाण उपाय म्हणून मनुका सेवनाचा पर्याय अजमावला जातो. रात्री साधारण ८-१० ग्रॅम मनुके पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी मनुक्यातील बिया बाजूला काढा. त्यानंतर दुधात टाकून मनुके उकळून घ्या आणि सेवन करा. जीरा किंवा ओव्याच्या सेवनातून बद्धकोष्ठतेवर मार्ग काढला जाऊ शकतो. तुम्हाला मंद गॅसवर जीरा व ओवा भाजल्यानंतर मिश्रण करा. तुम्ही समप्रमाणात काळे मीठ टाकून डब्ब्यात साठवून ठेवा. नियमित अर्धा चमचा मिश्रण गरम पाण्यात टाकून सेवन करा. ओवा आणि जीरायुक्त पाण्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेच्या जुनाट विकारांवर मात करता येते. गाजर, काकडी, डाळिंब तसेच सफरचंदाचा मिक्स ज्युस प्राशन केल्याने बद्धकोष्ठतेसहित सर्व पचन विकारांवर मात करता येते. आवळा व कोरफडीचा ज्यूस सकाळी घेतल्याने बद्धकोष्ठतेपासून दिलासा मिळतो. तसेच तुम्ही लिंबू आणि काळ्या मिठ्याच्या मिश्रणाचा वापर देखील करू शकतात. विद्राव्य तंतूने संपृक्त असलेल्या अंजीराच्या सेवनातून उत्सर्जनाची प्रक्रिया सुलभ बनते. त्यासोबत तुमचे पोट साफ ठेवण्यास मदत मिळते. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे रात्री पाण्यात भिजविलेले अंजीर सकाळी सेवन केल्यामुळे पचनसंस्थेसंबंधी विकारांपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतो.