शेतकऱ्यांचा निर्यातीकडे कल, भाजीपाला निर्यात करायचा आहे ? मग जाणून घ्या लागणारी आवश्यक कागदपत्रे
नवी मुंबई : कमी वेळेत अधिकचे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचा कल (Vegetable production) भाजीपाला लागवडीकडे वाढत आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढही होत आहे. मात्र, योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल दरामध्ये विक्री करावी लागत आहे. उत्पादनाचे नियोजन शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहे पण दर शेतकरी ठरवू शकत नाही त्यामुळे बाजारपेठेत आहे त्याच दरात विक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर येत आहे. भाजीपाला हे हंगामी पीक आहे. त्यामुळे योग्य बाजारपेठ आणि दराची सुत्रे जमवण्याचे मोठे अव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. निर्यात करुनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवता येते. मात्र, योग्य माहिती नसल्यामुळे अनेक शेतकरी ही प्रक्रियाच करीत नाहीत. त्यामुळे भाजीपाला (export-import) नर्यात करायचा कसा याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यास असणे गरजेचे आहे.
आयात निर्यात परवाना
भाजीपाला किंवा अन्य शेतीमाल निर्यात करायचा असेल तर आवश्यक आहे तो आयात-निर्यातीचा परवाना. त्यामुळे सर्वात आगोदर हा परवाना काढावा लागावा लागणार आहे. त्यामुळे परवाना काढण्यासाठी आयात-निर्यात नोंदणी संस्थेचे पत्र, भारत सरकारच्या आयकर विभागकडून मिळालेल्या खाते क्रमांक, ज्या व्यक्तीस परवाना काढायचा आहे त्या व्यक्तीचे पासपोर्ट साईज फोटो, सहसंचालक विदेशी व्यापाऱ्यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट, 30 रुपयांचा पोस्टल स्टॅंम्प ही कागदपत्रे आवश्यक आहे.
शेतीमालाच्या सुरक्षतेचे हमीपत्र
विदेशात शेतीमाल निर्यात करायचा असेल तर, दुसरे सर्वात महत्वाचे कागदपत्रे म्हणजे शेतीमाल सुरक्षित आहे यासंबंधीचे हमीपत्र. आता हे हमीपत्र काढण्यासाठी देखील काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. यामध्ये आरोग्यविषयक प्रमाणपत्र, पॅक हाऊस प्रमाणपत्र, सॅनेटरी प्रमाणपत्र, ग्लोबल गॅप हे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे आयात-निर्यात संस्थेकडे जमा करुन परवाना काढणे आवश्यक आहे.
उत्पन्नही दुपटीने
भारतीय भाजीपाल्याला विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यातच सेंद्रिय शेती पध्दतीचा अवलंब करुन भाजीपाल्याचे उत्पादन घेतले तर अधिकचा फायदा होणार आहे. स्थानिक बाजारपेठेपेक्षा निर्यात केली तर दुपटीने दर मिळतो. शिवाय ही प्रक्रिया आता सोपी झाल्याने शेतकऱ्यांचा निर्यातीकडे कल आहे.