मुंबई APMC फळ मार्केट मध्ये झालेले अग्नि तांडवला मार्केट उप सचिव जबावदार, कारवाई होणार का ?
मुंबई APMC फळ मार्केट   मध्ये झालेले अग्नि तांडवला मार्केट उप सचिव जबावदार, कारवाई होणार का ?
- ज्या मार्केट मधील दुर्घटना घडली त्या मार्केटची उप सचिव कमिटीवर
- मुंबई APMC प्रशासनाची अजब गजब कारभार
- आगीला महिना उलटला, अहवाल विसरला
- एपीएमसी प्रशासनाचा सुस्तावलेला कारभारमुळे मुंबई APMC मार्केट राम भरोसे!
नवी मुंबई : मंबई APMC फळ मार्केटमध्ये   १७ नोव्हेंबरला मोठी आग लागली होती या आगीमध्ये २० ते २५ गळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते, फळ मार्केटच्या बरोबर धान्य मार्केट मध्ये एका स्टॉल मध्ये आगीची घटना   घडली होती. त्यामुळे एपीएमसीतील अग्नि सुरक्षेचा प्रश्न समोर आला होता. महिना भरा पुर्वी लागलेल्या आगीच्या घटनेत अतिक्रमण तसेच कोणतेही अग्निशामक यंत्रणा नसल्याने पसरल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने सचिव राजेश भुसारी यांनी मार्केट मधील ६ अधिकार्यांची एक विशेष समिती गठीत केली होती. महत्वाची बाब असे आहेत कि ज्या मार्केट मधील मोठा दुर्घटना घडली होती त्या मार्केटच्या उप सचिवावर कारवाई करण्याऐवजी त्यांना कमिटी मध्ये घेण्यात आली आहे त्यामुळे कमिटीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही समिती या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारांची पाहणी करून अहवाल सादर करणार होती. परंतु आता एक महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही अहवाल सादर करण्यात आला नाही. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाच्या अजब गजब   कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तसेच बाजार समिती राम भरोसे सुरु असल्याचे दिसून येत आहे.
एपीएमसी फळ बाजाराततील ढिगभर असलेले पुठ्ठे आणि अतिक्रमणामुळे अधिक पसरली होती. यात २० ते २५ गाळे आगीच्या भक्षस्थानी सापडले होते. येथील कागद पुठ्ठे,लाकडी खोके व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे ही आग अधिकच भडकल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक अधिकाऱ्याने दिले होते. मार्केट उप सचिवावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही ,कारवाई करण्याऐवजी त्यांना विशेष समिती मध्ये घेण्यात आले .या उप सचिवाला पाठिंबा देणाऱ्या ते संचालक कोण ? असे चर्चा बाजार आवारात सुरु आहे. बाजार आवारात   अग्निशामक यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने अशा आगीच्या घटना घडल्यास मोठ्या दुर्घटना होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्यात यावी अनुषंगाने एपीएमसी प्रशासनाने एक विषय समिती गठीत केली होती . या समितीने १५ दिवसात   पाचही बाजाराची पाहणी करून काही मुद्दे निदर्शनास आणले आहेत. यामध्ये फुटपाथवर   वाढीव जागेचा गैरवापर, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण अग्निशामक यंत्रणा नसणे, पार्किंगची व्यवस्था नसणे इत्यादी बाबी समोर आल्या आहेत.
भाजीपाला आणि फळबाजारात संचालकांनी आपल्या गळ्यात अनधिकृत बांधकाम केले असून बहुतांशी व्यापार्यांनी अनधिकृत बांधकाम करून एकावर एक इमले रचून नीचे दुकान उपर मकान बनवून भाडेतत्वावर दिले आहे. मार्केटमध्ये जवळपास ३ हजार अनधिकृत बांधकाम करण्यात आली आहे.   महापालिका आणि पणन विभागाचे कुठल्याही परवानगी न घेता वेकायदेशीर ही   बांधकाम करण्यात आली   आहे   त्यामुळे महापालिका व APMC प्रशासनकडून व्यापार्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार का ? तसेच भाजीपाला व फळ मार्केटमध्ये पेसेज व धक्क्यावर अनधिकृतपणे शेतमालाची व्यवसाय करून बाजार समितीच्या महसूल बुडवणाऱ्यावर कारवाई होणार का ? भाजीपाला मार्केटमध्ये गलाधारकांनी आपल्या गाळे भाडेवर देउन तिथे किरकोळ वायपर सुरु केले आहे यावर कारवाई होणार का ? फळ मार्केटमध्ये ओपनशेडमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यावर आणि ओपनशेड पूर्णपणे कब्जा करून भाडेवर देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार का ? वाहेरून येणाऱ्या शेतमालची गाड्या या अनधिकृत स्टॉल आणि कँटीनमुळे रस्त्यावर   अडकतात यामुळे   वाहतूक कोंडी बरोबर व्यापाऱ्याची नुकसान होतो ?   भाजीपाला मार्केटमध्ये अनधिकृतपणे रिक्षा सोडून बाजार आवारात वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या त्या गेट कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का ? हे या अहवालातून स्पष्ट होईल. ही समिती १५ दिवसात अहवाल सादर करणार होती. परंतु एक महिना उलटूनही अद्याप अहवाल सादर न केल्याने अहवालास दिरंगाई का? होत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात एपीएमसी चे सचिव राजेश भुसारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही जबाब दिले नाही .