फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
सणांच्या काळात नेहमी फुलांचे भाव वाढलेले असतात. सध्या सर्व ठिकाणी लग्नसराई, मार्गशीर्ष उपवास आणि मंदिरे या काळात बाजारात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु अवकाळी पावसाचा परिणाम हा फुलशेती वर सुद्धा झालेला आहे. याचाच परिणाम हा फुलांच्या भावावर सुद्धा झालेला आहे. अवकाळी पावसामुळे फुलशेती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांच्या भावात दुप्पट वाढ झाली आहे.
बाजाराचे एक साधे गणित आहे. मालाच्या उत्पादनात घट झाली की भाव हे वाढतच राहतात. मागणीच्या तुलनेत फुलांचा पुरवठा कमी झाल्यामुळे फुलांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सध्या लग्नाचा आणि उपवासाचा काळ आहे त्यामुळे बाजारात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसाने सर्वच पिकाचे नुकसान केले आहे. त्याचा परिणाम हा फुलशेती वर सुद्धा झालेला आहे. फुलशेती चे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे फुलांचे भाव दुप्पट वाढले आहेत.
सध्या बाजारात फुलांची कमतरता भासत आहे त्यामुळे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या महिन्या पेक्षा या महिन्यात फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. बाजारात झेंडू, निशिगंध, शेवंती, जरबेरा या फुलांच्या किंमतीत दुपटीने वाढ झालेली आहे. व्यापारी वर्गाच्या अंदाजानुसार या महिन्यात फुलांना अशीच मागणी राहिली तर फुलांचे भाव अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा फटका कांदा, फळबागा आणि फुलशेती याला बसला आहे. या नुकसनामुळे फुलांचे उत्पन्न घटले आहे तसेच बाजारातील वाढती मागणी आणि फुलांचा तुटवडा यामुळे फुलांचे भाव मोठया प्रमाणात वाढलेले आहेत.