आहारात ठेवा, बहुगुणी कांदा
कांदा अनेकांच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. कांदा मसाला देखील आहारात वापरला जातो. स्वाद वाढीसाठी भाजीत देखील वापर केला जातो. तर कांदा हा सलाद म्हणुन कच्चा देखील खाल्ला जातो.
कांदा हा फक्त आहाराचा स्वादच नाही वाढवीत तर ह्याचे सेवन शरीरासाठी देखील फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. कांदा हा आयुर्वेदिक असतो आणि त्यांचा वापर हा अनेक आयुर्वेदिक औषधमध्ये केला जातो. कांद्या मध्ये अनेक पोषक तत्वे असतात, तसेच व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई देखील कांद्यात असतात. त्यामुळे ह्याचे सेवन केल्याने अनेक फायदे होतात. कांद्यामध्ये मॅग्नेशियम, फॉसफरस, बीटा कॅरोटीन सारखे अनेक पोषक घटक असतात त्यामुळे याचे सेवन करण्याचा डॉक्टर नेहमी सल्ला देत असतात. अशा पोषकतत्वेयुक्त कांद्याचा रस शरीरासाठी खुप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. चला तर मग जाणुन घेऊया कांद्याचा रस पिल्याचे आश्चर्यकारक फायदे.
कांद्याचा रस हा खुप थंड असतो म्हणुन ह्याचे उन्हाळ्यात सेवन खुपच फायदेशीर असते असे असले तरी जळजळ दूर करण्यासाठी कांद्याच्या रसाचाही खूप उपयोग होतो. कांद्याच्या रसामध्ये वेदनाशामक असते जे वेदना कमी करणारे आणि दाहक-विरोधी असते. अशा स्थितीत कांद्याच्या रसाचे सेवन केल्याने सूज आणि वेदना या दोन्ही समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.हिवाळ्यात ह्याचे लिमिटेड प्रमाणात सेवन केले तर अनेक फायदे होतात. म्हणून ह्याचे प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. म्हणून आज आपण जाणुन घेऊया कांद्याचा रस पिण्याचे फायदे
कांद्याचा रस डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कांद्याच्या रस पिल्याने काय फायदे होतात यासंबंधीचे एक संशोधनही करण्यात आले होते त्यानुसार असे समजले की, कांद्याच्या रसाच्या सेवनाने माणसाची कमी होणारी दृष्टी वाढू शकते. धावपळीच्या दिवसात अनेक लोकांना झोपेची समस्या भेडसावत असते अशा लोकांनी कांद्याचा रस प्यायलास हि समस्या कमी होण्यास मदत होईल. कांद्याच्या रसामध्ये शामक गुणधर्म असल्याचे बोलले जाते.
हे गुणधर्म मन शांत ठेवण्यासाठी उपयुक्त असतात त्यामुळे कांद्याचा रस हा निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
मार लागला की ती जागा हि सुजते अशा परिस्थिती मध्ये कांद्याचा रस जर सेवन केला तर सूज हि दुर होऊ शकते. कांद्याच्या रसामध्ये वेदनाशामक घटक असतात जे वेदना कमी करणारे असतात तसेच दाहक-विरोधी असतात. त्यामुळे कांद्याच्या रसाचे सेवन केल्याने सूज आणि वेदना या दोन्ही समस्या दूर होऊ शकतात.