मुंबई APMC भाजीपाला घाऊक बाजारात भाज्यांचे दोन भाव ,शेतकरी,ग्राहक कंगाल तर व्यापारी मालामाल
मुंबई आणि उपनगरात भाज्यांची दर का वाढतो यासाठी मुंबई एपीएमसी मार्केटमधील वास्तव परिस्थितीची माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत. कारण मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून एवघ्या कवडीमोल किंमतीत भाजीपाला खरेदी केला जातोय. तर दुसरीकडे अव्वाच्या सव्वा दरात सर्वसामान्यांना हा शेतमाल विकला जातोय.
नवी मुंबई:मुंबई APMC भाजीपाला घाऊक बाजार आवारात भाजीपाल्याला दोन दर आकारले जात असल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय बाजार समिती प्रशासन प्रसिद्ध करत असलेले दर आणि मुळात बाजार आवारात असलेले दर यात तफावत असल्याचे समोर आले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास ५५० गाड्यांची आवक झाली असून घाऊक बाजारात प्रत्येक भाज्यांची दर १५ ते ४० रुपये किलो बिक्री केला जात आहे मात्र याच मार्केटमधील डी पाकळीमध्ये दुपटी आणि तिप्पट दराने भाजीपाला बिक्री केला जात आहे त्यामुळे मुंबई आणि उपनगर मध्ये ग्राहकांना १०० रुपये किलो दराने भाजीपाला खरीदी करायला लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल भाव देणारे व्यापारी आणि ग्राहकांना मात्र अधिक पटीने भाजीपाला विकत घ्यावे लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे.एकीकडे शेतकरी उध्वस्थ होत चालला आहे, तर दुसरीकडे सामान्य ग्राहक महागाईने बेजार झाला आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये शेतकरी आणि ग्राहकांमध्ये हि निर्माण झालेली लॉबी कोणाच्या आशीर्वादाने हे काम करते असा सवाल केला जात आहे. तर बाजार समिती प्रशासन यावर गप्प का? तर बाजार समितीवर निवडून आलेले शेतकरी प्रतिनिधी नक्की काय करत आहेत असा सवाल देखील विचारला जात आहे यावर मुंबई एपीएमसी उप सभापती धनंजय वाडकर यांनी सांगितले कि मार्केटमध्ये प्रत्यक्ष्य पाहणी करून कारवाई करणार .
मुंबई आणि उपनगरात भाज्यांची दर का वाढतो यासाठी मुंबई एपीएमसी मार्केटमधील वास्तव परिस्थितीची माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत. कारण मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून एवघ्या कवडीमोल किंमतीत भाजीपाला खरेदी केला जातोय. तर दुसरीकडे अव्वाच्या सव्वा दरात सर्वसामान्यांना हा शेतमाल विकला जातोय.
नेमकं प्रकरण काय?
मुबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाहीय. शेतकऱ्याने पाठवलेल्या शेतमालाची लाखो रुपये थकबाकी वर्षानुवर्षे व्यापारी ठेवत आहेत. पैशांसाठी शेतकरी फक्त हेलपाटे घालताना दिसत आहेत. बाजार समितीला योग्य सेस सुद्धा मिळत नाही.
शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत
मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात सध्या जवळपास ६०० गाड्यांची आवक होत आहे. बाजार आवारात करण्यात आलेल्या खरेदी-विक्रीच्या सर्वेक्षणातून शेतकरी ते ग्राहक दरातील तफावत प्रकर्षाने समोर आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारसमितीमध्ये घाऊक भाजीपाला मार्केट आहे. घाऊक बाजारात चार पाकळ्या आहेत.
एकाच मार्केटमध्ये दुप्पट दरात भाजीपाला विक्री
या मार्केटमध्ये जवळपास 80 टक्के व्यापाऱ्यांनी व्यापार न करता आपले गाळे भाड्याने दिले आहेत. एका गाळ्यामध्ये 4 ते 5 जण व्यापार करतात. सध्या घाऊक बाजार आवारात दोन विभाग झाले आहेत. डी विंगमध्ये पूर्णपणे किरकोळ दरात भाज्या विकल्या जात आहेत. डी पाकळीमध्ये भाजीपाल्याची 30 ते 70 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर इतर पाकळीमध्ये १५ ते ४० रुपये किलो भावाने भाजीपाला विकला जात आहे. अशाप्रकारे सध्या एकाच मार्केटमध्ये दुपट्ट दराने भाजीपाला विक्री केला जात आहे यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे त्यासाठी शेतकरी संस्थांचे अध्यक्ष राजाराम टोके यांनी सांगितले कि व्यापारी व्यापाऱ्याच्या हिताचे काम करणार शेतकऱ्यांसाठी नाही या घाऊक बाजारात दोन दराने बिक्री केळ्याने मार्केट मधून जाणाऱ्या भाजीपाला उपनगरता चारपट भावाने बिक्री केला जातो त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकाला मोठा नुकसान होतो यासाठी राज्याचे मुखमंत्री आणि पणन मंत्री लक्ष्य दियाला पाहिचे नाही तर शेतकरी ग्रहक कंगाल तर मुंबई एपीएमसी व्यापारी मालामाल होणार .
टोके पुढे सांगितले कि भाजीपाला मुंबई आणि मुंबई उपनगरात गेल्यास चारपट अधिक दराने विक्री केला जात आहे. यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी या दोघानांही फायदा होईल. शिवाय हे व्यापारी आपल्या भाड्याच्या दुकानात स्वत:च्या नावावर लाखो रुपयांचा शेतमाल मागवतात आणि माल विक्री करुन पळ काढतात. त्यामुळे शेतकरी बाजारात येऊन व्यापाऱ्याला शोधत राहतो. मात्र, त्याची फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात येते.
शेतकरी आणि ग्राहकांचं नुकसान
घाऊक बाजारात कमी दराने मालाची विक्री केली जाते. मात्र, त्याच ठिकाणी किरकोळ मार्केटमध्ये दुप्पट भावाने माल विकला जातो. एकीकडे कमी किंमतीला विकला जाणारा माल तर दुसरीकडे मात्र हाच माल दुप्पट किंमतीच्या भावाने विकला जातो. त्यामुळे APMC मार्केटमध्ये भाजीपाल्याचे एकच मार्केट असून जागेच्या भाड्याच्या किंमतींमुळे व्यापारी भाज्यांचे भाव वाढवत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर आणि ग्राहकांवर झालेला दिसून येत आहेत.
व्यापाऱ्यांची नेमकी भूमिका काय?
या बाबतीत बाजारात काही व्यापाऱ्यांना विचारपूस केली असता व्यापाऱ्यांनी सांगितले कि, बाजार समितीमध्ये संचालकांनी डी पाकळीमधील भाजीपाला किरकोळ भावात विकण्यासाठी सूट दिली आहे. शिवाय या व्यापाऱ्यांकडून बाजार समितीचा सेस भरणा होत नाही. त्यामुळे प्रतिदिन जवळपास सरासरी 600 गाड्यांची आवक होऊन देखील बाजार समितीकडे 20 टक्के सेस जमा होत आहे. त्यामुळे मार्केट संचालकांनी काही व्यपाऱ्याना घेऊन बाजार समिती संपण्याच्या मागे असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर पणन मंत्री,सभापती ,उप सभापती आणि मार्केट सचिव काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
22/12/2021  मुंबई बाजार समितीमधील घाऊक आणि घाऊक बाजार समितीमधीलच किरकोळ भावातील दर :
घाऊक बाजारातील भाज्यांचे दर (प्रतिकिलो)                                      किरकोळ बाजारातील दर (प्रतिकिलो)
फ्लावर- २०                                                                                              फ्लावर-५०
टोमॉटो- २०                                                                                              टोमॉटो- ४०
कोबी- १६                                                                                                  कोबी- ८०
वांगी- ३०                                                                                                  वांगी- ६०
कारले- ३०                                                                                                कारले- ८०
वाटाणा- २५                                                                                            वाटाणा- ४०
भेंडी-४०                                                                                                  भेंडी- ८०
गाजर -१४                                                                                              गाजर-४०
मिर्ची -३०                                                                                                मिर्ची -७०
शिमला -३०                                                                                            शिमला मिर्ची -६०
शेवगा -१००                                                                                            शेवगा -२००