मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील सेसची वसुलीत घोटाळा?
मुंबई APMC भाजीपाला   मार्केटमधील सेसची वसुलीत घोटाळा?
- मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील ५ महिन्यात   भाज्यांचे आवक आणि दरात वाढ मात्र सेसची वसुली मध्ये कमी
- भाजीपाला मार्केट पेक्ष्या कांदा बटाटा मार्केटच्या   सेस मध्ये वाढ .
- हा सेस नक्की जातो कुठे असे सवाल उपस्थित होत आहे.
- भजीपाला ५० प्रकारचे आहे कांदा बटाटा आणि लसूण तीन प्रकार आहें
नवी मुंबई : पावसाच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे यंदा कृषीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका दररोज लागणाऱ्या भाजीपाल्याला बसला असून गेल्या सहा महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर चढेच आहेत. दिवाळीआधी बहुतांश भाज्यांचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहचले होते. मात्र दिवाळीनंतर तर किंमतींनी उच्चांक गाठला असून घाऊक बाजारातच भाज्या १०० ते १२० रु. किलो झाल्या आहेत. परिणामी किरकोळ बाजारात भाज्यांचे दर किलोमागे १२० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आतापर्यंत बाजाराच्या इतिहासात हे सर्वाधिक दर आहेत. बाजार आवारात जवळपास ५०० ते ६५० गाड्यांची आवक होत असते फळभाजी आणि पालेभाजी मिळून ५० प्रकारच्या   भाज्या आहेत. कांदा बटाटा मार्केट मध्ये कांदा   बटाटा लसूण हे ३प्रकार येतात तरीही   भाजीपाला मार्केटची वसुली दर कमी का ? मुंबई APMC मार्केट मधील बाजारभावात कधी वाढ तर कधी घसरण पाहायला मिळते. दर महिन्याला बाजारातील सेस काढला जातो. कांद्याच्या भाव १० ते २५ रुपये असताना कांदा बटाटा मार्केटच्या सेस मध्ये ५ महिन्यापासून वाढ झाली आहे ,तसेच या पाच महिण्यात पितृपक्ष्य,गणपती आणि   नवरात्र सणात भाज्यांचे दरात वाढ असताना सेस मध्ये कमी पाहायला मिळत आहे. कांदा बटाटा पेक्ष्या भाजीपाला महाग असेल तर भाजीपाल्याचा सेस अधिक यायला हवा पण तस न होता कांदा बटाटाचे सेस जास्त आहेत. मुंबई APMC मार्केट मधील मे पासून सप्टेंबर पर्यंत एकूण वसुली आकडा पाहायला गेलं तर.
कांदा बटाटा मार्केट वसुली २ कोटी ८९ लाख २१ हजार , फळ मार्केट वसुली ३ कोटी ४२ लाख ९६ हजार , भाजीपाला मार्केट वसुली २ कोटी ४०लाख ६७ हजार ,
मसाला मार्केट वसुली ८ कोटी   १६ लाख ८५ हजार ,धान्य मार्केट वसुली ९ कोटी १५ लाख ७६ हजार ,यामध्ये एका महिन्यात धान्य मार्केट २ कोटी रुपयांचा सेस भरून मार्केटचे रेकॉर्ड तोडले तर कांदा बटाटा आणि भाजीपाला मध्ये तफावत दिसून येते. हा सेस नक्की जातो तरी कुठे? यावर सभापती आणि सचिव काय निर्णय घेणार याकडे सगळंच्या लक्ष्य लागले   आहे. सर्व भाज्यांचे दर ५० रुपये होऊन सुद्धा सेस मध्ये मोठी तफावत याच कारण काय? असा प्रश्न उपस्तित होत आहे.