धक्कादायक! शेतकऱ्यांना टोमॅटो भाव मिळतो २ रुपये, मुंबई APMC मार्केट मध्ये टमाटो २० रुपये प्रतिकिलो.
धक्कादायक! शेतकऱ्यांना टोमॅटो भाव मिळतो २ रुपये, मुंबई APMC मार्केट मध्ये टमाटो २० रुपये प्रतिकिलो.
- मुंबई APMC कोणासाठी शेतकऱ्यांसाठी या दलालासाठी.  
- शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त  
- मुंबई APMC भाजीपाला घाऊक बाजारात टोमॅटो २० रुपये किलो
- टॅमोटो शेतकरी कंगाल तर भाजीपाला व्यापारी   मालामाल
- सभापती अशोक डक यांची कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह
- राज्यात ठीक ठिकाणातून आलेले शेतकरी प्रतिनिधी मुंबई APMC मार्केटमध्ये शेतकरी ,व्यपाऱ्याचे प्रश्न सोडून दुसरे कामात व्यस्त.
- शेतकरी ,व्यापारी ,आणि कामगार उध्वस्त होण्याच्या दिशेने  
नवी मुंबई : मागील महिन्यात शंभरी पार गेलेला टोमॅटोचा दर आजच्या दिवशी सव्वादोन रुपये किलो एवढ्यावर येऊन ठेपला आहे. नाशिकच्या गिरणारे बाजार समितीत हिरडी गावातील भगवान महाले या शेतकऱ्याला अवघे सव्वादोन रुपये भाव मिळाला आहे. एकूणच नाशिकच्या गिरणारे, नाशिक, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्या टोमॅटोसाठी प्रसिद्ध असून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना टोमॅटो व्यापऱ्यांना देण्याची वेळी आली आहे. टोमॅटो उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्च सोडा साध्या औषध फवारणीचा खर्च देखील सुटू शकत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण झाला असून मेटकुटीला आला आहे.दुसरीकडे मुंबई एपीएमसी भाजीपाला   मार्केटमधील टॉमॅटो २० रुपये प्रतिकिलोने बिक्री केला जात आहे यामध्ये मार्केट मध्ये आलेले शेतकरी प्रतिनिधी व सभापती अशोक डक यांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.   कारण मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून एवघ्या कवडीमोल किंमतीत भाजीपाला खरेदी केला जातोय. तर दुसरीकडे अव्वाच्या सव्वा दरात सर्वसामान्यांना हा शेतमाल विकला जातोय त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक कंगाल तर वयापारी मालामाल असे दिसून येत आहे . मुंबई APMC भाजीपाला मार्केट रात्री दोन ला सुरु होतो त्यावेळी मार्केटमध्ये बाजार समितीच्या   अधिकारी नसल्याने मार्केटच्या नियंत्रण ठराविक वयापारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्याच्या हातात असते.मार्केटमध्ये शेतकऱ्यांना पाठवण्यात आलेले शेतमालाला हमीभाव मिळत नाही त्यामुळे मार्केट संचालक आणि सभापती यांच्या भोंगळ कारभार समोर आली आहे.
मुंबई   कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाहीय. शेतकऱ्याने पाठवलेल्या शेतमालाची लाखो रुपये थकबाकी वर्षानुवर्षे व्यापारी ठेवत आहेत. पैशांसाठी शेतकरी फक्त हेलपाटे घालताना दिसत आहेत. बाजार समितीला योग्य सेस सुद्धा मिळत नाही. 
शहरातील ग्राहक शेतीमाल खरेदी करतो त्यावेळी बऱ्याचदा जादा दरांबाबत त्याची नेहमी तक्रार असते. प्रत्यक्षात बहुतांशवेळा शेतकरी बाजार समितीमध्ये शेतमाल विकतो त्यावेळी त्याला पडक्या दरात व्यापाऱ्यांना विक्री करावा लागतो. हाच शेतीमाल मध्यस्थ साखळीद्वारे शहरात ग्राहकांना विकला जातो. पण व्यापारी अव्वाच्या सव्वा नफा मिळवितात, असे शेतकरी ते ग्राहक दराच्या केलेल्या पाहणीतील निष्कर्षातून समोर आले आहे. शेतीचे वारंवार नुकसान होत असल्याने शेतीसाठी भांडवल कमी पडत आहे, त्यातच उधारीवर घेतलेली औषधे खते ही परत कशी करायची असा यक्ष प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडू लागला आहे तर दुसरीकडे मुंबई APMC मार्केटमध्ये आलेले शेतकरी प्रतिनिधी सगळे प्रकरण जाणून सुद्धा याकडे दुर्लक्ष्य कर आहेत . राज्याचे मुख्यमंत्री आणि पणन मंत्री एकनाथ शिंदे याकडे लक्ष्य दियाला गरजेचे आहे नाही तर शेतकऱ्यांना मोठा प्रमाणात नुकसान होऊन आत्महत्यांची वेळ येणार आहे….