करदात्यांना जवळपास दिड कोटीहुन अधिक रुपयांचा परतावा; एनएनआयनंची ट्विटद्वारे माहिती
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (CBDT) यांच्याकडून १ लाख ७९ कोटीहून अधिक करदात्यांना १ लाख ६२ हजार ४४८ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. १ एप्रिल २०२१ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यानच्या कालावधीत ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. ५७ हजार ५४ कोटी रुपये १ कोटी ७७ लाख ३५ हजार ८९९ प्रकरणांमध्ये ही रक्क्म वर्ग करण्यात आली आहे. कॉर्पोरेट टॅक्स रिफंड (Corporate Tax Refund) १ लाख ४ हजार ६९४ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. एकूण २ लाख २३ हजार ९५२ प्रकरणांमध्ये ही रक्क्म वर्ग करण्यात आली आहे. ज्या करदात्यांनी आयकर परतावा फाईल केला असेल. म्हणजेच उत्पन्नावर जितका कर लागणार आहे. त्यापेक्षा जादा रक्कम आयकर विभागाकडे जमा केली असल्यास ती रक्कम परत करदात्यांना रिफंडच्या माध्यमातून देण्यात येते.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनच्या वतीनं आयकर परतावा म्हणून ५७ हजार ७५४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. १ लाख ७७ हजार ८९९ प्रकरणांमध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. सीबीडीटीनं ही रक्कम ट्रानस्फर केल्याची माहिती एनएनआयनं ट्विट द्वारे दिली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन कॉर्पोरेट टॅक्स रिफंड १ लाख ४ हजार ६९४ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. आयकर विभागाने पाठवलेल्या परताव्याच्या रकमेची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग वेबसाईटला भेट द्यावी लागते. येथे लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर आपण येथे आयकर परतावा स्थिती तपासू शकता.