इराणी सफरचंदाच्या आयातीने देशातील शेतकरी आणि व्यापारी कंगाल तर इराणी व्यापारी मालामाल
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये सध्या सफरचंदाचा हंगाम सुरु आहे. देशासह देशाबाहेरून सफरचंदाची आवक या ठिकाणी होत आहे. मात्र, इराणी सफरचंदांमुळे काश्मीर आणि हिमाचल सफरचंदाचे बाजारभावात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. शिवाय वेळे आधी इराणी सफरचंद बाजारात आल्याने काश्मीर आणि हिमाचल सफरचंदाच्या बाजारावर परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. परिणामी बाजारभावात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी सुद्धा हवालदिल झाले आहेत.
इराणी सफरचंद आकर्षक असल्याने दरवर्षी नियमित विक्रीपेक्षा निम्म्या किमतीत स्थानिक सफरचंद विकावे लागत असल्याचे व्यापारी म्हणाले.शिवाय माल सुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणात पडून असल्याचे सांगण्यात आले. तर इराणी सफरचंद APMC मार्केटमध्ये न येताच कोल्ड स्टोरेज मधून थेट विक्री होत असल्याने बाजार समितीचेहि नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी केवळ ५ टक्के ग्राहक बाजारात उरल्याची खंत व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली. तर अशीच परिस्थिती काही दिवस राहिल्यास सफरचंद व्यापाऱ्यांसह देशाचा शेतकरी देशोधडीला लागेल अशी भावना व्यापारी व्यक्त करत आहेत.
हा माल परस्पर बाजार समिती बाहेर विकला जात असल्याने बाजार समितीचा करोडो रुपये सेस बुडत असल्याचे बोलले जात आहे.
यावर्षी हंगाम संपेपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महागाई वाढून सुद्धा दहा वर्षांपूर्वीचा बाजारभाव देखील काश्मीर आणि हिमाचल सफरचंदाला मिळत नसल्याची नसल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. तर याबाबत APMC प्रशासनाने योग्य माहिती सरकारला दिली नसल्याने हि वेळ APMC व्यापारी आणि देशाच्या शेतकऱ्यांवर आली असल्याचा आरोप व्यापारी करत आहे. जर देशाची शेतकरी आणि व्यापारी टिकवायचे असेल तर आता सुद्धा सुद्धा इराणच्या मालाची आयात बंद केल्यास ते शक्य आहे. शिवाय बाहेरून हे इराणी व्यापारी प्रत्येक्ष येथे येऊन व्यापार करत आहेत. हा माल उतरवण्यात आलेल्या शीतगृहांसमोर संध्याकाळ ते रात्रीपर्यंत ग्राहकांची तोबा गर्दी पहायला मिळत आहे.
इराणचे प्रतिदिन जवळपास १०० ते १२५ कंटेनर येतात तर ५० कंटेनर विक्री होत आहे. या सफरचंदासह किवीचे सुद्धा २५ कंटेनर या ठिकाणी उतरवले जातात.
शिवाय इराणचा सफरचंद हंगाम एप्रिल महिन्यापर्यंत चालणार असल्याने या वर्षी काश्मीर आणि हिमाचलच्या सफरचंद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असे दिसत आहेत. तर शासनाने बांधलेल्या शीतगृहात ३ करोड पेटी सफरचंद ठेवले आहे. ते कधी बाजारात येणार आणि त्याला काय दर मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर इराणी सफरचंदाची आयात केली गेल्याने देशातील व्यापारी आणि शेतकरी उध्वस्थ होणार असल्याने सरकारच्या या धोरणाबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.