मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये कांदा, बटाटा व लसणाची अनधिकृत व्यापार जोरात ,संचालक व APMC प्रशासन जोमात!
मुंबई   APMC भाजीपाला मार्केटमध्ये कांदा, बटाटा व   लसणाची अनधिकृत व्यापार जोरात ,संचालक व APMC प्रशासन जोमात!
आम्ही संचालकांची माणसं, आमच कोण वाकडं करणार’?
बाजार समितीच्या नोटिसनंतरही भाजीपाला मार्केटमध्ये कांदा, बटाटा आणि लसणाचा व्यापार सुरुच!
या अनाधिकृत व्यापारच्या फ़ायदा बाज़ार समितिला नसताना ठराबिक व्यापारयना होत आहे.
मुंबई APMC कांदा बटाटा मार्केट मध्ये नक्की चालय तरी काय? पाहुयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट भाजी पाला ,मार्केट मध्ये कांदा बटाटा सप्लाय करण्यासाठि २२ व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात आली होती त्यात काही अटींचा समावेश करण्यात आला होता भाजी बाजार आवारामध्ये कांदा   बटाटा लसूण विकत येणार नाही , भाजी बाजार आवारात आणलेला कांदा बटाटा लसूण हा शेतमाल बाजार आवारात दुपारी ३ ते ६ या वेळेतच   आणता येईल , भाजीबाजार आवारात एका वेळी जास्तीत जास्त ५० गोण्या कांदा बटाटा लसूण   कांदा बटाटा मार्केटची काटपट्टी दाखवून आणता येईल   पण तरीही   ४० ते ५० व्यापारी अनधिकृतपणे   भाजीपाला मार्केटमध्ये   कांदा   ,बटाटा,आणि लसूणाची किरकोळ व्यबसाय   करत आहेत. भाजीपाला मार्केट मध्ये कांदा   बटाटा आणि लसूणचा अनधिकृत पणे विक्री केली   जात आहे सूत्रांनी सांगितले   प्रमाणे या व्यापाऱ्यांकडून महिन्यात लाखो रुपये गोळा केले जात आहे हे   पैसे नक्की कोणाच्या खिशात जातात. या व्यापार्यामुळे कांदा बटाटा   मार्केटच्या व्यापाऱ्यांना मोठा प्रमाणात नुकसान होत असून बाजार समितीला देखील आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.   यामध्ये कांदा बटाटा मार्केट संचालक गप्प का असे प्रश्न   उपस्थित केला जात आहे.  
काही महिन्यापूर्वी कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज यांनी कांदा-बटाटा व्यापाऱ्यांसह अचानकपणे भाजीपाला मार्केटमध्ये पाहणी दौरा केला होता. दरम्यान मार्केट परिसरात प्रत्येक विंग मध्ये अनधिकृतपणे कांदा,बटाटा आणि लसणाचा व्यापार सुरू होता. या पाहणी दौऱ्या दरम्यान मार्केट उपसचिव तसेच सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.
भाजीपाला मार्केटमध्ये कांदा बटाटा अनधिकृतपणे बिक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी करून त्यांची संपूर्ण माहिती देण्याचे पत्र संचालकांनी सचिवाला दिले होते. तसेच तत्कालीन सचिव संदिप देशमुख यांनी देखील भाजीपाला बाजारात येणाऱ्या कांदा-बटाटा आवकवर बंदीचे आदेश दिले होते. मात्र या सगळ्या प्रकरणाला फाटा देत भाजीपाला मार्केटमध्ये आजपण   व्यापार सुरूच आहे. शिवाय मार्केटमध्ये कांदा, बटाटा आणि लसणाची आवक   देखील सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दालनात अनधिकृत व्यपार बंद करण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीत कांदा बटाटा, भाजीपाला, फळ मार्केटच्या संचालक देखील उपस्थित होते. तरी देखील बाजार समितीमध्ये अनधिकृत व्यापार सुरु असल्याने संचालक निष्क्रिय ठरत असून पुन्हा मुंबई APMC मध्ये प्रशासक आणण्याची मागणी बाजार घटक करत आहेत.
१. भाजीपाला बाजार आवारात कांदा, बटाटा, लसून आणण्यासाठी रितसर रूपये २५०००/ अनामत रक्कम ठेऊन उपसचिव कार्यालयाची परवानगी घेण्यात यावी.
२. भाजीबाजार आवारात एका वेळी जास्तीत जास्त ५० गोण्या कांदा / बटाटा, लसूण फक्त कांदा बटाटा मार्केटची काटापटटी दाखवून आणता येईल.
३. प्रत्येक गोणी मांगे रुपये २/- प्रमाणे सेवाशुल्क आकारण्यात येईल. ४. भाजी बाजार आवारामध्ये कांदा, बटाटा लसून विकता येणार नाही.
५. भाजी बाजार आवारात आणलेला कांदा, बटाटा, लसून हा शेतमाल फक्त कॅन्टीन हॉटल, जेलईत्यादी घटकांना शेतमाला सोबत पुरवठा करण्याकरिता आणता येईल.
६. कांदा, बटाटा, लसून शेतमाल बाजार आवारात दुपारी ३ ते ६ या वेळतच आणता येईल उपरोक्त सुचनांचे उल्लंघन झाल्यास भाजीबाजार आवारात कांदा, बटाटा, लसून या शेतमाल आणण्याची परवानगी रदद करण्यात येईल. त्याचप्रमाणे संबंधीत अनुज्ञप्तीधारकांचे अनुज्ञप्ती निलंबन रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
असे आदेश बाजार समितीकडून   काढण्यात आले होते या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे . नवीन आलेले सचिव राजेश भुसारी यावर कश्याप्रकारे कारवाई करतील यावर कांदा बटाटा व्यापाय्राचे लक्ष लागले आहे.